सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात पोलिसांकडून गांजासह अंमली पदार्थावर जप्तीची कारवाई केली जात आहे. दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख तसेच अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या सुचनेनुसार बोरगाव पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी एकाच दिवशी दोन ठिकाणी शनिवारी धडक कारवाई केली आहे. यामध्ये ६ किलो ३५० ग्रॅम वजनाचा व एकूण १ लाख ५६ हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्येमाल जप्त केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बोरगांव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि श्री रविद्र तेलतुंबडे यांना कुसवडे ता. जि. सातारा गावात गांजाची झाडे लावल्याबाबत तर नागठाणे गांवी गांजाची विक्री होत असल्याबाबत माहिती मिळाली. त्याप्रमाणे श्री तेलतुंबडे यांनी अधिनस्त अधिकारी व अंमलदार यांच्यामार्फत दि. २८ रोजी बोरगाव पोलीस ठाणे हद्यीत एकाच दिवशी २ स्वतंत्र कारवाया केल्या. यापैकी पहिल्या कारवाईमध्ये अशोक पांडुरंग पवार, रा. कुसवडे, ता जि सातारा याने कुसवडे गावी त्याच्या राहत्या घराजवळ गांजाच्या झाडांची लागवड केली असल्याचे आढळून आले. त्या ठिकाणाहून ५ किलो १३० ग्रॅम वजनाचा व एकुण १ लाख २८ हजार ५०० रुपये किंमतीच्या गांजासद्रश्य वनस्पती जप्त केल्या आहेत.
तर दुसऱ्या कारवाईमध्ये अमोल आण्णा मोहिते हा मोहिते हा नागठाणे गांवात त्यांच्या घराजवळ गांजाची विक्री करीत असल्याने त्या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला. यावेळी अमोल मोहिते याच्याकडून १ किलो १२० ग्रॅम वजन व एकुण २८ हजार रुपये किंमतीचा गांजा जप्त केला आहे. याप्रमाणे एकत्रीत ६ किलो ३५० ग्रॅम वजनाचा व एकुण १ लाख ५६ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत बोरगांव पोलीस ठाणेमध्ये २ स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पैकी एका गुन्हयाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक डाळींबकर तर दुसऱ्या गुन्हयाचा तपास पोलीस उप निरीक्षक श्री राजाराम निकम हे करीत आहेत.
सदर कारवाई ही पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री किरणकुमार सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली बोरगांव पोलीस ठाणेचे सपोनि श्री रविद्र तेलतुंबडे, पोऊनि श्री राजाराम निकम, सहा पोलीस उप निरीक्षक श्री कारळे, पो हवा ६७ अमोल सपकाळ, पो हवा २२०२ दादा स्वामी, पो हवा २२३४ सुनिल कर्णे, पो ना १००६ दिपक मांडवे, पो ना १९६६ प्रशांत चव्हाण व म पो ना २०७१ नम्रता जाधव, पो को १२२० संजय जाधव, पो कॉ २६०४ दादा माने इ पोलीस अधिकारी अंमलदार तसेच श्रीमती सुजाता पाटील, निवासी नायब तहसिलदार व फॉरेन्सीक युनिट, सातारा येथी पो हवा ५५५ मोहन नाचण, पो हवा ८२ रुद्रायण राऊत, पो कॉ ३७८ अमोल निकम व नाकोटीक डॉग युनिट पथकाचे पोऊनि श्री धनावडे, डोंग हॅन्डलर पो को २३९१ दत्तात्रय चव्हाण व आंमली पदार्थ शोधक श्वान सुचक हे सहभागी झाले होते.