कराडच्या तासवडेत पोलीसांनी पकडला 10 लाखांचा गुटखा जप्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील कराड तालुक्यातील तासवडे येथील टोल नाक्यावर तळबीड पोलिसांनी टेंपोसह दहा लाख ३० हजार रुपयांचा गुटखा पकडला. पोलिसांनी याप्रकरणी एकाला ताब्यात घेतले आहे.

विकास वसंत जाधव (वय ३५, रा. गणेश चौक, कोडोली, सातारा) असे संशयिताचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की महामार्गावर शनिवारी (ता. २१) रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास निपाणी (कर्नाटक) येथून टेंपो गुटखा घेऊन जाणार आहे, असे तळबीड पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी किरण भोसले यांना माहिती मिळाली होती. त्यानुसार तासवडे टोल नाक्यावर नाकाबंदी करून टेंपो ताब्यात घेतला.

त्याची झडती घेतली असता त्यामध्ये १० लाख ३० हजार रुपये किमतीचा गुटखा आढळून आला. पोलिसांनी टेंपोसह १० लाख ३० हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त केला आहे. तळबीड पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित विकास वसंत जाधवला पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे.

या कारवाईत किरण भोसले, चालक नरेंद्र मोरे, सहायक पोलिस फौजदार शशिकांत खराडे, हवालदार गोरखनाथ सांळुखे, शहाजी पाटील, सुशांत कुंभार, प्रवीण गायकवाड, अभय मोरे, गणेश राठोड, नीलेश विभूते, महिला पोलिस कर्मचारी रत्ना कुंभार यांनी सहभाग घेतला.