स्फोटकांच्या सहाय्याने केली रानडुकराची शिकार; पोलीसांनी केला दोघांवर गुन्हा

0
807

पाटण प्रतिनिधी | पिठाच्या गोळ्यात भरलेल्या स्फोटकाच्या सहाय्याने रानडुकराची शिकार केल्याचा प्रकार पाटण तालुक्यातील कुंभारगाव परिसरात उघडकीस आला. वनविभागाने या प्रकरणी २ संशयितांना ताब्यात घेवून त्यांच्यावर गुन्हा दाखल केले आहे. दरम्यान या प्रकरणामुळे परिसरात स्फोटकांचा वापर करून केल्या जाणाऱ्या शिकारी पुन्हा चर्चेत आल्या आहेत.

पाटण तालुक्यातील कुंभारगाव विभागातील परिसरात वन्यप्राणी ये-जा करण्याच्या मार्गावर स्फोटकांने भरलेले पिठाचे गोळे ठेवून शिकार करण्याचे अनेक प्रकार यापूर्वी घडले आहेत. यात अनेक वन्यप्राणी व चरायला सोडलेली पाळीव जनावरे मृत्युमुखी पडल्याच्या तसेच स्फोटकांचे गोळे काढून घ्यायचे राहून गेल्याने त्यावर पाय पडून शेतकरीही जखमी झाल्याच्या घटना यापूर्वी अनेकदा परिसरात घडलेल्या आहेत. काही दिवसांपुर्वी कुंभारगाव खालील बामणवाडीत असाच प्रकार घडला.

सहाय्याने रानडुकराची शिकार करून ते घेवून जाण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना वन कर्मचाऱ्यांनी रंगेहात ताब्यात घेवून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. संशयितांना पाटण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची जामिनावर मुक्तता केली. राजेश नलवडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल शशिकांत नागरगोजे, अमृत पन्हाळे, वनरक्षक अश्विन पाटील, वन सेवक आबासाहेब गंगावणे, अजय कुंभार, नथुराम थोरात, अजय सुतार, किरण साबळे आदींनी कारवाईत सहकार्य केले.