कराड प्रतिनिधी | कराड शहरातील भाजी मंडई, मुख्य बाजारपेठेसह शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेलेले तब्बल २५ मोबाईल कराड शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने हस्तगत केले. सुमारे ५ लाख २० हजारांचे हे मोबाईल आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस अधीक्षक समीर शेख,अपर पोलीस अधीक्षक ऑचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड़ अमोल ठाकूर यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांना कराड शहर ही सातारा जिल्हयातील एक मुख्य बाजारपेठ असुन पोलीस ठाणे हह्दीत मोबाईल गहाळ होण्याचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन सदर मोबाईल तक्रारीबाबत गांभीर्याने लक्ष देऊन जास्तीत जास्त मोबाईल शोध घेऊन ते परत करण्याबाबत आदेशीत केले होते. त्याअनुषंगाने के.एन. पाटील यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकास योग्य ते मार्गदर्शन करुन सदरचे गहाळ झाले मोबाईलचा तात्काळ छाड़ा लावण्याबाबत आदेशीत केले होते. त्यानुसार तात्काळ कारवाई करत महाराष्ट्र तसेच इतर विविध राज्यातुन 5 लाख 20 हजाराचे एकुण 25 मोबाईल परत मिळवुन तक्रारदार यांना श्री. के.एन. पाटील यांचे हस्ते केले परत केले.
कराड शहर हे सातारा जिल्हयातील एक मुख्य बाजार पेठ आहे. त्यानुसार कराड शहरास एक मोठी ओळख आहे. कराड शहरात आजुबाजुचे गावातुन दरोज हजारोच्या संख्येने लोक नोकरी, रोजगार व शिक्षणासाठी कराडमध्ये येत असतात. त्यावेळी प्रवासात, बाजार पेठेत व ईतर ठिकाणी मोबाईल गहाळ होण्याचे प्रमाण अधिक आहे. पोलीस उप निरीक्षक श्री पतंग पाटील व पथकाने अश्या गहाळ झालेल्या मोबाईलची सायबर पोलीस ठाणेच्या माध्यमातुन माहिती प्राप्त करुन सदर माहितीचे पोलीस अंमलदार संग्राम पाटील व महेश शिंदे यांनी तांत्रिक विषलेशन करत महाराष्ट्र राज्याचे विविध भागातुन तसेच इतर राज्यातुन मोबाईल परत मिळवत गहाळ झालेले मोबाईल तक्रारदार यांना परत केले आहेत. गरीबीची परस्थिती असताना देखील कर्ज काढून घेतलेले मोबाईल हरवले असतात्यांचे मोबाईल परत मिळाल्याने जन सामान्यातुन पोलिस प्रशासना विषयी प्रशंसनीय भावना व्यक्त करण्यात येत आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक ऑचल दलाल, सातारा मा.उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड अमोल ठाकूर व मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील कराड शहर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हें प्रकटीकरण अधिकारी पोलीस उप निरीक्षकपतंग पाटील पोलीस हवा. शशिकांत काळे, अमित पवार, पोलीस नाईक, कुलदिप कोळी, संतोष पाडळे,पो. शि. संग्राम पाटील, महेश शिंदे, अमोल देशमुख, मुकेश मोरे,दिग्विजय सांडगे यांनी केलेली आहे.