पाचगणीत रिसॉर्टवर छम छम; 10 ते 12 बारबालांसह 48 जणांवर पोलिसांची धडक कारवाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । जिल्ह्यातील 24 खते औषधे बी बियाणे विक्रेत्या डीलर असे एकूण 35 ते ते 36 जणांवर सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख व अपर पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांनी काल धडक कारवाई केली. पाचगणी टेन्ट हाऊस रिसॉर्टवर छापा टाकून संबंधितांना अटक केल्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. रविवारी रात्री साडेदहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे.

याप्रकरणी यामध्ये पाचगणी टेन्ट हाऊस रिसॉर्ट चा मालक डॉक्टर विजय दिघे आंबेघर तालुका जावळी यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत पाचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दोन महिन्यापूर्वी देखील पाचगणी येथील कासवंड येथे स्प्रिंग व्हॅली या रिसॉर्टवर देखील अशाच पद्धतीच्या बारबाला नाचवल्या गेल्या होत्या. यामध्ये सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध पाच डॉक्टरांवर कारवाई करण्यात आले होते. त्यानंतर सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांची पाचगणी येथील पाचगणी टेन्ट हाऊस या रिसॉर्टवर मोठे कारवाई मानली जात आहे.

काल रात्री साडेदहाच्या सुमारास सातारा पोलीस यांची टीम या रिसॉर्टवर पोहोचली आणि या रिसॉर्टवर सुरू असणान्या छम छम वर सातारा पोलिसांनी छापा टाकला. यामध्ये रिसॉर्टच्या आत असणाऱ्या बारा बारबाला व सोलापूर जिल्ह्यातील कृषी खत विक्री व्यवसायिक असे एकूण 36 जणांना पोलिसांनी चौकशी करून ताब्यात घेतले आहे. बाकी काही खत विक्री व्यवसायिक व बारबालांसह डान्स करणारे पाच ते सहा जण घटनास्थळावर आलिशान गाड्या सोडून पळून गेले.