सातारा प्रतिनिधी | सातारा शहर परिसरातील पाच जुगार अड्यावर पोलिसांनी छापे टाकत नुकतीच धक कारवाई केली आहे. याप्रकरणी मटका किंग समीर कच्छी याच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल झाला. सातारा नगरपालिकेसमोर चालणाऱ्या अड्यावरील कारवाईत श्रीरंग आनंदराव पवार (कय 56, रा. रघुनाथपुरा, करंजे) समीर सलीम कच्छी (रा. मोळाचा ओढा) या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी या अड्डय़ांकरून रोख रक्कम जुगाराचे साहित्य असा सुमारे 1 हजार 680 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दुसरी कारवाई कोडोलीमध्ये करण्यात आली. याप्रकरणी जितेंद्र लादमल शहा, रजत जितेंद्र शहा (दोघे रा. कोडोली) क समीर सलीम कच्छी यांच्याकर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून रोख रक्कम क जुगाराचे साहित्य असा सुमारे 23 हजार 550 रुपयांचा ऐकज जप्त करण्यात आला आहे. तिसरी कारवाई सदर बझारमध्ये करण्यात आली.
याप्रकरणी भीमा शिवय्या गुत्तेदार (रा. भीमाबाई आंबेडकरनगर) समीर सलीम कच्छी (रा. मोळाचा ओढा) यांच्याकर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून रोख रक्कम, जुगाराचे साहित्य असा सुमारे 2 हजार 20 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
चौथी कारवाई चंदननगर कोडोली येथे करण्यात आली. याप्रकरणी रामदास श्रीरंग यादव (रा. धनगरकाडी, कोडोली) समीर सलीम कच्छी (रा. मोळाचा ओढा) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्याकडून रोख रक्कम क जुगाराचे साहित्य असा सुमारे 1 हजार 520 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पाचवी कारवाई सदर बझारमधील लोखंडी पुलाजवळ करण्यात आली.
या प्रकरणी उत्तम कल्याण दंडगुले (रा. लक्ष्मी टेकडी) समीर सलीम कच्छी (रा. मोळाचा ओढा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून रोख रक्कम, जुगाराचे साहित्य असा सुमारे 840 रुपयांचा ऐकज जप्त करण्यात आला आहे.