सातारा प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होताच, पोलिसांनी शनिवारी (दि. 16) फलटण शहरात रूट मार्च काढण्यात आला.
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस उपअधीक्षक राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण शहरातील गजानन चौक, टोपी चौक, शंकर मार्केट, गणपती मंदिर, उमरेश्वर चौक, मलठण मशीद, पाचबत्ती चौक, आखरी रास्ता, टेंगूळ चौक, बारामती चौक,
छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, स्तंभ चौक, गजानन चौक, महात्मा फुले चौक, तहसील कार्यालय असा रूट मार्च शनिवारी सायंकाळी काढण्यात आला. यामध्ये फलटण शहर पोलीस ठाण्याचे चार अधिकारी, 24 अंमलदार, पोलीस मुख्यालयाकडील 15 अंमलदार लाठ्या हेल्मेटसह सहभागी झाले होते.