सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील जयरामस्वामी वडगाव येथे चोरटी वाळू वाहतूक करणाऱ्या दोघांवर औंध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी चालक व मालक यांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातील डंपर व वाळू असा सुमारे 8 लाख 20 हजार रुपये किमंतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक धोंडीराम वाळवेकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली. डंपर चालक नवनाथ बळवंत दुबळे (रा. येरळवाडी, ता. खटाव) व मालक हेमंत राजेंद्र गोडसे (रा. वडूज, ता खटाव ) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि. धोंडीराम वाळवेकर, पोलीस हवालदार प्रविण करांडे, रविंद्र बनसोडे, पो.काॅ. किरण हिरवे, प्रमोद इंगळे, मेघा फडतरे, आरसीपी प्लाटूनकडील अंमलदार पो. कॉ. सपकाळ, राक्षे यांनी या कारवाईत सहभाग घेतला. अधिक तपास पोलीस नाईक आर. एस. सरतापे करत आहेत.