सातारा प्रतिनिधी | फलटण तालुका आसू येथे गेल्या अनेक दिवसांपासून देशी दारूची विक्री होत असल्यामुळे त्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून केली जात होती. दरम्यान, आसू (ता. फलटण गावच्या हद्दीत राहत्या घराच्या आडोशाला देशी दारूची बिगर परवाना विक्री करताना फलटण ग्रामीण पोलिसांनी एकावर कारवाई केली. त्याच्याकडून ९१० रूपये किमतीची देशी दारूच्या १३ सीलबंद प्लास्टिक बाटल्या जप्त केल्या.
बबन चिंतामण भिंगारे (वय ५५, रा. आसू, ता. फलटण) असे संशयित आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, फलटण तालुक्यात वाढत असलेल्या अनेक अवैध्य धंद्याच्या विरोधात कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी दिल्यानंतर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तालुक्यात कारवाईची मोहीम सुरू केली आहे.
याचाच एक भाग म्हणून फलटण तालुक्यातील आसू या गावच्या हद्दीत छुप्या पद्धतीने घरात देशी दारूची विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी या ठिकाणी दि. 8 रोजी धाड टाकत देशी दारूची विक्री करताना सबंधित विक्रेत्यास रंगेहाथ पकडले. तसेच त्याच्याकडून माल जप्त केला. या प्रकरणी अधिक तपास पो. ना. साबळे करत आहेत.