दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीस अटक; 3 लाख 37 हजाराचा मुद्देमाल जप्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । कराड शहर परिसरातील काही ज्वेलर्स दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीच्या मुसक्या कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने आवळल्या आहेत. अटक केलेल्या टोळीत पाच जणांचा समावेश असून त्यातील पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर त्यांच्याकडून ३ गावटी पिस्टल, ४ जिवंत काडतुसे, २ कोयते असा एकूण ३ लाख ३७ हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

Karad Crime News

बबलू उर्फ विजय संजय जावीर (वय 32 रा. शहापूर इचलकरंजी, ता. इचलकरंजी, जिल्हा कोल्हापूर), निकेत वसंत पाटणकर (वय 30 रा. साईबाबा मंदिराजवळ गोडोली सातारा, ता. सातारा, जि. सातारा), सुरज नानासो बुधावले (वय 24, रा. बुधावलेवाडी विसापूर पुसेगाव, ता. खटाव, जि. सातारा), राहुल अरुण मेनन (वय 24, रा. कुईल कुडम त्रिशूल, केरळ राज्य, सध्या रा. सैदापूर आयटीआय कॉलेज जवळ कराड), आकाश आनंदा मंडले (रा. खटाव, पोस्ट वसगडे, ता. पलूस, जिल्हा सांगली) असे संशयीताचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, कराड येथील विद्यानगर परिसरात गेल्या दोन महिन्यापासून रेकॉर्डवरील पाचजण वास्तव्यात आहेत. यामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर, इचलकरंजी आणि कराडमधील एकाचा समावेश आहे. सोमवारी सकाळी कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेला हे पाचजण विद्यानगर परिसरात रूम घेऊन राहत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याठिकाणी जाऊन छापा टाकला असता पोलिसांना पाहून सर्वजण सैरभर पळू लागले. पोलिस आणि रेकॉर्डवरील गुंड यांच्यामध्ये यावेळी झटापटही झाली. त्यावेळी पाचजणापैकी तिघेजण पोलिसांच्या हाती लागले. तर दोघेजण पळून गेले.

त्यानंतर दुपारी पोलिसांनी एकास पाटण परिसरातून ताब्यात घेतले. तर आणखी एका संशयित आरोपीस आज अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांकडे कसून चौकशी केली असता कराड शहर परिसरातील एका ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा टाकण्याचा उद्देश असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तिघांकडून तीन पिस्टल, चार जिवंत काडतुसे, दोन कोयते चिकट टेप पाच दोऱ्या व एक चाकू असा मुद्देमाल जप्त केला आहे.

https://www.facebook.com/100066721152780/videos/477011858005647

घटनास्थळी डीवायएसपी अमोल ठाकूर, कराड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील यांनी भेट दिली. या घटनेचे गांभिर्य ओळखून पोलीस अधीक्षक समीर शेख, सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरूण देवकर हे तात्काळ कराडमध्ये दाखल झाले. त्यांनी पोलिसांना योग्य त्या सूचना करून पुढील कार्यवाही करण्यास सांगितले. दरम्यान, या प्रकरणाचा पोलीस कसून तपास करीत आहेत.