सातारा प्रतिनिधी | रहिमतपूर वाठार रस्त्यावर असणाऱ्या एस जे एस कॅफे अँड चायनीज या कॅफेमध्ये काही युवक व अल्पवयीन युवती अश्लील चाळे करताना रहिमतपूर पोलिसांना सापडले असून पोलिसांनी धडक कारवाई करत कॅफेचालक अमर रामचंद्र जाधव (रा. साप) याला अटक केली आहे. या कॅफेचालकाचा परवाना निलंबित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे .
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रहिमतपूर बसस्थानक ते वाठार रस्त्यावर असणाऱ्या या कॅफेमध्ये युवक व युवतींना अश्लील चाळे करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस अधीक्षक समीर शेख , अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, पोलीस उपअधीक्षक सोनाली कदम यांच्या मार्गदर्शनाखाली रहिमतपूरचे एपीआय सचिन कांडगे, पोलीस उपनिरीक्षक बी.जी .केंद्रे, सहाय्यक फौजदार जे . आर . पवार ,पोलीस नाईक एस .बी .शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल एस . एस देशमुख ,महिला पोलीस कॉन्स्टेबल एम .टी .कांबळे, डी .जे .गिरी ,एस . एस . पाटोळेयांनी अचानक छापा टाकला.
यावेळी या कॅफेमध्ये अनेक युवक व युवती अश्लील चाळे करताना सापडले आहेत . त्यांच्यावर रहिमतपूर पोलिसांच्या कडून कारवाई करण्यात आलेली आहे. रहिमतपूरमध्ये परिसरातील अनेक गावांमधील विद्यार्थी व विद्यार्थिनी शिक्षणासाठी येत असतात. या विद्यार्थ्यांमध्ये कॅफेची क्रेज दिसून येत असून अशा कॅफेमधून आक्षेपार्ह बाबी आढळल्यास कॅफेचालकावर सक्त कारवाई करण्यात येईल. रस्त्याने जाता येता मुलींची छेड काढल्यास रोड रोमिओवर सुद्धा सक्त कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती सपोनी सचिन कांडगे यांनी दिली.