सातारा प्रतिनिधी। केंद्र सरकारने लोकांच्या कल्याणासाठी आणि त्यांना आर्थिक सहाय्य मिळावे यासाठी विविध योजना सुरु केल्या आहेत. या महत्वाच्या योजनांमधील एक योजना म्हणजे पंतप्रधान किसान सम्मान निधी. या योजनेच्या माध्यमातून देशभरातील शेतकऱ्यांना 6 हजार रुपये वार्षिक आर्थिक मदत मिळत आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांना 18 हप्ते मिळाले असून, योजनेच्या 9PM Kisan Yojana) 19 व्या हप्त्याची रक्कम आजपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. देशातील सुमारे १० कोटी शेतकऱ्यांना एकूण 21,500 कोटी रुपये वितरित केले जात असून सातारा जिल्ह्यात 4 लाख 40 हजार 663 हून अधिक पीएम किसान योजनेचे लाभार्थी शेतकरी असून त्याच्यासाठी हि आनंदाची बातमी आहे.
किसान सम्मान निधी योजनेचा जे लोक या योजनेचा लाभ घेणार आहेत, त्यांना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे. योजनेच्या नियमांमध्ये एक महत्त्वाचा बदल करण्यात आला असून आता फक्त कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
आवश्यक कागदपत्रे आणि प्रक्रिया –
शेतकऱ्यांना 19 व्या हप्त्याचा (PM Kisan Yojana) लाभ मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि प्रक्रिया पूर्ण करणे महत्त्वाचे आहे. केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अधिकृत वेबसाईट pmkisan.gov.in भेट द्यावी. लाभार्थाची यादी पाहण्यासाठी pmkisan.gov.in वेबसाईटला भेट द्या.
योजनेत सामील होण्याकरिता ही आहे पात्रता
भारतीय नागरिक असणं आवश्यक आहे.
शेतीयोग्य जमीन असणं आवश्यक आहे.
अल्पभूधारक शेतकरी असावा.
शेतकरी प्राप्तिकर भरणारा नसावा.
जमिनीची स्वत:कडं मालकी असावी.
केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे.
कोणत्या तालुक्यात आत्तापर्यंत किती लाभार्थी?
जावली : एकूण शेतकरी : ६३४५३, लाभार्थी संख्या : १५५३३
कराड : एकूण शेतकरी : २४०२९८, लाभार्थी संख्या : ९८०७५
खंडाळा : एकूण शेतकरी : ६५२७४, लाभार्थी संख्या : २६३८३
खटाव : एकूण शेतकरी : १८४१०७, लाभार्थी संख्या : ५२६६५
कोरेगाव : एकूण शेतकरी : ११०२१५ , लाभार्थी संख्या : २६७१८
महाबळेश्वर : एकूण लाभार्थी : ३०७०९, लाभार्थी संख्या : ९९२७
माण : एकूण शेतकरी : १४८१६१, लाभार्थी संख्या : ५८७६४
पाटण : एकूण शेतकरी : १५७५५१, लाभार्थी संख्या : ३९०४१
फलटण : एकूण शेतकरी : १२६८८६, लाभार्थी संख्या : ५३६६८
सातारा : एकूण शेतकरी : १७५१५६, लाभार्थी संख्या : २२२६९
वाई : एकूण शेतकरी : ८२७०१, लाभार्थी संख्या : ३७६२९
जिल्ह्यातील एकूण शेतकरी : १३८४५११, एकूण लाभार्थी : ४४०६६३