साताऱ्यातील पंतप्रधान मोदींच्या ‘शिवसन्मान’ सोहळ्याचा नियोजन अहवाल फडणवीसांकडे सादर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शिवप्रभूंचे राजघराणे व तमाम शिवभक्तांच्या वतीने देण्यात येणारा पहिला ‘शिवसन्मान पुरस्कार’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर करण्यात आला आहे. साताऱ्यात दि. 19 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या भव्य-दिव्य सोहळ्यात या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. या पुरस्कार सोहळ्याचा नियोजनाचा अहवाल आज भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर करण्यात आला.

दि. 19 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात येणाऱ्या शिवसन्मान पुरस्कार सोहळ्याच्या साताऱ्यातील सैनिक स्कूलच्या मैदानावरील ठिकाणाची खासदार उदयनराजे भोसले यांनी चार दिवसांपूर्वी प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत केली होती. त्यानंतर साताऱ्यातील पुरस्कार सोहळ्याची चर्चा सुरु झाली.

साताऱ्यात होत असलेल्या कार्यक्रम सोहळ्याची व सभेच्या सर्व व्यवस्थापनाची माहिती व कार्यक्रमस्थळावरील व्यासपीठ, बैठक व्यवस्थेसह सुरक्षा यंत्रणा याचा अहवाल आज उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सातारा लोकसभा संयोजक सुनील काटकर यांनी सुपूर्द केला. यावेळी धैर्यशील कदम, बाळासाहेब खाडे, किशोर गोडबोले, मनीष महाडवाले, प्रवीण धस्के आदी उपस्थित होते. या अहवालानंतर भाजपमधील इतर वरिष्ठ नेत्याकडून कार्यक्रमापूर्वी देखील पाहणी केली जाणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे.