जिल्ह्यातील निवडणूक कर्मचारी, यंत्रणांच्या दळणवळणासाठी 449 ‘लालपरी’ सहभागी होणार

0
2
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । देश, राज्याच्या कारभारात मतदान हा महत्त्वाचा भाग मानला जातो. लोकशाहीचा हा उत्सव बुधवार, दि. २० रोजी साजरा होणार आहे. या उत्सवात सातारा जिल्ह्यातील निवडणूक कर्मचारी, यंत्रणांची ने- आण करण्यासाठी तब्बल ४४९ ‘लालपरी’ सहभागी होणार आहे. जिल्हा प्रशासनाने तशी मागणी राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा विभागाकडे नोंदविण्यात आली आहे.

सातारा जिल्ह्यातील सातारा, वाई, फलटण, कोरेगाव, कराड दक्षिण, कराड उत्तर, पाटण, माण विधानसभा मतदारसंघांसाठी बुधवार, दि. २० रोजी मतदान होत आहे. निवडणूक जवळ येत आहे, तसतसे राजकीय पक्षांच्या सभा, कोपरा सभा होत आहेत. आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. यामुळे जिल्ह्यातील वातावरण ऐन थंडीत तापले असून, ते ढवळून निघाले आहे.

दुसरीकडे विधानसभा निवडणूक यशस्वी पार पडावी, मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी प्रशासनाकडून जोरदारपणे प्रचार केला जात आहे. जावळी, महाबळेश्वर, पाटण तालुक्यांतील डोंगरदऱ्या, दुर्गम भागातील शाळा-शाळांमध्ये जाऊन जनजागृती केली जात आहे. मतदानाचा पवित्र हक्क बजावण्यासाठी वडीलधाऱ्यांकडे ‘बालहट्ट’ धरण्याचा सल्ला दिला जात आहे.

यासाठी प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी मैदानात उतरले आहेत. मतदानावेळी कोणतीही गडबड होऊ नये म्हणून निवडणूक कर्मचारी, अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. दिवाळीपूर्वीही एक टप्पा पार पडला. आहे. तर अशा कर्मचाऱ्यांची मतदान प्रक्रियाही सुरू झाली आहे.

दुर्गम भागात बोटीचा वापर…

सातारा तालुक्याच्या पश्चिमेला कास, बामणोली, तापोळा तसेच महाबळेश्वर तालुक्यातील अनेक गावे ही दुर्गम आहेत. त्या गावांना पाण्यातून जावे लागते. अशावेळी बोटी, तरफांचाही वापर करावा लागत असतो; पण आवश्यक त्या सर्व यंत्रणांचा वापर करून निवडणूक यशस्वी करण्यासाठी चंग बांधला आहे. त्याला प्रशासनातील विविध विभागांची मदत होत आहे.