सातारा प्रतिनिधी । विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत निवडणूक आयोगामार्फत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीप अंतर्गत मतदारांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करण्याच्या अनुषंगाने 255 फलटणचा विधानसभा मतदारसंघांमध्ये श्रीराम बाजार फलटण येथे मतदार जनजागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी “आपले मत आपले भविष्य” व “मतदार राजा जागा हो” लोकशाहीचा धागा हो” या घोषणा देण्यात आल्या व मतदानात भगवा असे आव्हान करण्यात आले. यावेळी उपस्थित महिलांनी मतदान हक्क बजावण्याबाबत प्रतिज्ञा घेतली.
यावेळी जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराजन या उपस्थित होत्या. त्यांनी लोकसभा निवडणूक 2024 मध्ये फलटण तालुक्यातील मतदान जनजागृती बाबत उल्लेखनीयकामामुळेच मतदानाचा टक्का जिल्ह्यात वाढला व त्याच प्रमाणे विधानसभा निवडणुकीध्यदेखील उत्कृष्ट कामगिरी करेल अशी खात्री व्यक्त केली.
यावेळी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. दिनकर बोरडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी सातारा डॉ. विनोद पवार, गटविकास अधिकारी फलटण एस के कुंभार, स्वीप नोडल अधिकारी सचिन जाधव, तसेच मतदार जनजागृती मेळाव्यामध्ये श्रीराम बाझार मधील अधिकारी, कर्मचारी वर्ग आणि ग्राहक उपस्थित होते मेळावा यशस्वी होण्यासाठी नोडल अधिकारी स्वीप कक्ष सचिन जाधव व स्वीप टीम यांनी विशेष परिश्रम घेतले