फलटण ते बारामती रस्त्याचे कामकाज अंतिम टप्प्याकडे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | फलटण ते बारामती रस्त्याचे कामकाज हे अंतिम टप्प्यात आले आहे. यामध्ये अनेक अडीअडचणी आल्या होत्या त्यामध्ये प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी पुढाकार घेत स्थानिक पदाधिकारी, प्रकल्पग्रस्त शेतकरी व स्थानिक राजकारणी यांच्याशी समन्वय साधत सदरील रस्त्याचे काम युद्धपातळीवर करण्याचे निर्देश दिले.

प्रांताधिकारी ढोले यांनी नुकतीच फलटण ते बारामती रस्त्याचे कामकाजाची प्रत्यक्ष भेट देत पाहणी केली. यावेळी त्यांनी कामाची पाहणी करत अधिकाऱ्यांना सूचना देखील केल्या.

यावेळी प्रांताधिकारी ढोले म्हणाले की, रस्त्याच्या मध्यभागी चांगल्या दर्जाची झाडे लावून रस्ता सुशोभित करा अशा सूचना देण्यात आल्या आहेत. येत्या एक महिन्यात काम पुर्ण करण्याचा प्रयत्न राहणार आहे. यामध्ये जो रस्ता अपूर्ण राहिला होता; तो पूर्णत्वास जाण्यासाठी सर्वांच्या समन्वयातून तो पूर्णत्वास जाणार आहे.