अवैध गांजाची वाहतूक प्रकरणी दोघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या; 7 लाख 27 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात बेकायदेशीरपणे गांजाची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईची धडक मोहीम पोलिसांकडून राबविली जात आहे. दरम्यान, आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास फलटण पोलिसांच्या पथकाने बारामतीहुन फलटणकडे गांजाची वाहतूक करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सुका गांजा व विना नंबरप्लेटची मोटार सायकल असा एकुण 7 लाख 27 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

1)आशिष जालिंदर पवार (रा. पाहुणेवाडी, ता. बारामती, जि. पुणे) 2) कुणाल बाळासो कांबळे (रा. शारदानगर, माळेगावकॉलनी, ता. बारामती, जि. पुणे) असे अटक केलेल्या दोघा आरोपींची नावे आहरेत. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सातारा जिल्ह्यामध्ये अवैध व्यवसायाचे समुळ उच्चाटन करण्याच्या दृष्टीने पोलीस अधीक्षक समीर शेख व अपर पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना आदेश दिले होते. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांचे मार्गदर्शनाखाली फलटण ग्रामीण पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक सुनिल महाडीक यांनी अवैध धंद्यांविरुद्ध विशेष मोहिम सुरु केली.

दरम्यान, आज सोमवारी दोन इसम एका मोटार सायकलवरुन बारामतीहून फलटणकडे मोठ्या प्रमाणात गांजा विक्रीसाठी घेऊन जाणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक श्री. सुनिल महाडीक यांना मिळाली. यानंतर त्यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली छापा कारवाईचे नियोजन करुन सांगवी, ता. फलटण गावचे हद्दीत बारामती-फलटणरोड लगत सापळा लावला. त्यानंतर आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास 1)आशिष जालिंदर पवार (रा. पाहुणेवाडी, ता. बारामती, जि. पुणे) 2) कुणाल बाळासो कांबळे (रा. शारदानगर, माळेगावकॉलनी, ता. बारामती, जि. पुणे) हे एका नंबरप्लेट नसलेल्या मोटार सायकलवरुन सुमारे 5 लाख 77 हजार 500 रुपये किंमतीचा व 23 कि. ग्रॅ. वजनाचा गांजा एका पांढऱ्या रंगाच्या पोत्यातुन बारामतीहुन फलटणकडे घेऊन जात होते.

त्यावेळी पोलीस निरीक्षक श्री सुनिल महाडीक यांचे सापळा पथकातील पोलीसांनी त्यांना अडवले. सदरचा गांजा ते अक्षय चव्हाण (रा. शिरवली, ता. बारामती) याचे सांगणेवरुन फलटणकडे घेऊन जात असल्याचे त्यांनी तपासामध्ये सांगितले. त्याचवेळी दुसऱ्या मोटार सायकलवरुन त्यांना साथ करणारे करण मदने (रा. शिरवली, ता. बारामती) व दुसरा एक अनोळखी इसम हे त्यांचे मोटार सायकलवरुन पळुन गेले. सदर छापा कारवाईमध्ये एकूण सुका गांजा व विना नंबरप्लेटची बजाज पल्सर मोटार सायकल असा एकुण 7 लाख 27 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक मा. समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक मा. आँचल दलाल व उपविभागीय पोलीस अधिकारी मा. राहुल धस यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने, मच्छिंद्र पाटील, पोलीस अमंलदार नितीन चतुरे, वैभव सूर्यवंशी, श्रीनाथ कदम, संदीप मदने, योगेश रणपिसे, अमोल जगदाळे, तुषार आडके, श्रीकांत खरात, हनुमंत दडस, विक्रम कुंभार, सुरज काकडे, अमोल देशमुख, प्रिती काकडे, रशिदा पठाण यांनी सदरची कारवाई केली आहे. सदर घटनेच्या अनुषंगाने फलटण ग्रामीण पोलीस ठाणेस गुन्हा नोंद असुन पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने हे करीत आहेत.