फलटणमध्ये कोयत्याचा धाक दाखवून मागितली खंडणी; पोलिसांनी आरोपीला 4 तासात ठोकल्या बेड्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | फलटण शहरातील मध्यवर्ती भागातील एका व्यापाऱ्यास खंडणीची मागणी करत कोयता व तलवारीचा धाक दाखवून दोघांनी लुटल्याची घटना रविवारी बाजारादिवशी सायंकाळी पावणेपाच सुमारास घडली होती. या घटनेनंतर अवघ्या चार तासात चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दि. २४/०९/२०२३ रोजी सायंकाळी ४.४१ वाजण्याच्या सुमारास १३५ रविवारपेठ उघडया मारुती मंदीरासमोर फलटण येथे मॅचिंग सेंटर दुकानात अरिजय दोशी हे गि-हाईकाला अस्तर देत होते. यावेळी आदित्य अहिवळे या युवक हातात कोयता तर त्याचा मित्र हातात तलवार घेऊन आला. काही कळणार इतक्यात आदित्य अहिवळे याने अरिजय यांच्या अंगावर कोयता उघारुन दुकानाच्या काऊन्टर मधुन अंदाजे २५ हजार रुपये रक्कम जबरदस्तीने काढुन घेवुन गेला.

तसेच वैभव रमनलाल दोशी (वय ५३) यांच्या फुलचंद दुलचंद दोशी यांचे किराणा मालाच्या दुकानात जावुन वैभव दोशी यांना तलवारीचा व कोयत्याचा धाक दाखवुन “प्रत्येक महिन्याला ३ हजार रुपये हप्ता दिला पाहिजे तरच तुम्ही धंदा करुन शकाल व तुम्ही जर ही रक्कम आम्हास दिली नाही तर याच कोयत्याने तुम्हाला जिवे मारु,” अशी धमकी देत दमदाटी केली. त्यानंतर तौसिफ निजामुद्दीन शेख यांच्या दुकानातुन बॅट हिसकावुन घेवुन दुकानातुन बाहेर जावुन दुकानावर दगडफेक केली. या सर्व घडलेल्या प्रकरणात सं आरोपी विरुद्ध फलटण शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदरचा गुन्हा घडल्यानंतर घटनास्थळी पोलीस ठाणे कडील महीला पोलीस उपनिरीक्षक दिपाली गायकवाड व गुन्हे प्रकटीकरण पथक हे तात्काळ जाऊन सदर ठिकाणी उपलब्ध असणारे सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्यावेळी सदरचा आरोपी हा पोलीस ठाणे अभिलेखावरील सराईत २ आरोपी असुन त्यांनीच सदरचा गुन्हा केला असल्याचे निष्पन्न झाले. त्याप्रमाणे आरोपीचा शोध कामी पोलीस ठाणे कडील गुन्हे प्रकटीकरण पथक व इतर स्टाफचे खास पथके तयार करण्यात आली.

त्यानंतर गोपनिय माहिती व आरोपीच्या मोबाईल नंबरच्या आधारे माहिती घेतला असता आरोपी मुंबईला पळुन जाणार असल्याची गोपनिय माहिती मिळाली. त्याप्रमाणे मिळालेल्या माहितीनुसार पोलीस पथकाने सदर आरोपींचा पाठलाग करुन लोणंद पोलीस ठाणे हद्दीमध्ये त्याला ताब्यात घेतले. सदर आरोपीकडे गुन्हयाचे अनुषंगाने अधिक चौकशी करुन सदर २ आरोपी याला नमुद गुन्हयाचे तपास कामी अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा अधिक तपास श्री परीतोष दातीर, पोलीस उपनिरीक्षक फलटण शहर पोलीस ठाणे हे करत आहेत.

सदरची कामगीरी पोलिस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधिक्षक बापू बांगर, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, पोलीस निरीक्षक सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दीपाली गायकवाड, स. फौ . सांळुखे, हवालदार वाडकर, धापते, धायगुडे, फाळके, काळुखे, जगताप, पाटोळे, कर्णे, खराडे, धायगुडे, टिके, जगदाळे घोरपडे, देशमुख, जगताप, फाळके, पवार, करपे यांनी सदरची कारवाई केली आहे.