संजय गांधी, इंदिरा गांधी व श्रावणबाळ योजनेच्या लाभासाठी सातारा तालुक्यात होणार विशेष शिबीर

0
364
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । संजय गांधी, इंदिरा गांधी व श्रावणबाळ योजनेच्या लाभासाठी सातारा तालुक्यातील विविध गावांमध्ये शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे. संजय गांधी, इंदिरा गांधी व श्रावणबाळ या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना लाभ मिळण्यासाठी सातारा तालुक्यात विशेष शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे, याचा लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार नागेश गायकवाड यांनी केले आहे.

सातारा तालुक्यात शेंद्रे 24 जानेवारी, अपशिंगे 27 जानेवारी, दहिवड 29 जानेवारी, तासगाव 31 जानेवारी, परळी 3 फेब्रुवारी, वडूथ 4 फेब्रुवारी, वर्ये 10 फेब्रुवारी, अंबवडे 11 फेब्रुवारी, कण्हेर 12 फेब्रुवारी, खेड 14 फेब्रुवारी,कोडोली 17 फेब्रुवारी, करंजे त सातारा 18 फेब्रुवारी, सातारा 20 फेब्रुवारी व नागठाणे 21 फेब्रुवारी या दिवशी हे विशेष शिबीर पार पडणार आहे.

संजय गांधी योजना व श्रावणबाळ योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

कोर्ट फी स्टँप लावून अर्ज करावा
तलाठी यांचा रहिवास व उत्पन्न दाखला
तहसिलदार यांचा उत्पन्न दाखला (उत्पन्न मर्यादा 21 हजार व दिव्यांगासाठी 50 हजार पर्यंत)
रेशनकार्ड झेरॉक्त प्र
विधवा असल्यास पतीच्या मृत्युचा दाखला सत्यप्रत
दिव्यांग प्रमाणपत्र सत्यप्रत
परितक्त्या असल्याबाबत ग्रामविकास अधिकारी प्रमाणपत्र
अनाथ असल्यास अनाथ असलेबाबत दाखला
वयाचा दाखला
दुर्धर आजार असल्यास सिव्हिल सर्जन यांचे प्रमाणपत्र
आधारकार्ड झेरॉक्स प्रत
छाननी तक्त्यामधील 1 ते 6 मुद्याबाबतचे प्रतिज्ञापत्र