पाटण प्रतिनिधी । पाटण विधानसभा मतदार संघात सध्या राजकीय वातावरण चांगलचं तापलेलं आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून हर्षद कदमांनी उमेदवारी मिळवली असल्याने मुख्यमंत्री शिंदेंचे शिलेदार शंभूराज देसाई यांच्यात व हर्षद कदम यांच्यात लढत होणार आहे. मात्र, सत्यजित पाटणकरांनी देखील बंड करत अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. पाटणकर निवडणूक लढल्यास पालकमंत्री देसाई यांची जागा धोक्यात येऊ शकते. कारण हर्षद कदमांपेक्षा पाटणकर गटाच्या पाठिशी जनता जास्त असल्याने यात शंभूराज देसाई किव्हा हर्षद कदम या दोघांपैकी एकाचा करेक्ट कार्यक्रम नक्की होणार यात शंका नाही.
शंभूराज देसाई यांना २०१९ सालातील निवडणुकीत मतदारांनी निवडून दिले असले तरी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकी मध्ये शंभूराज देसाई यांना जेवढे मताधिक्य मिळाले होते त्याच्या निम्मेही मताधिक्य खा. उदयनराजे यांना देता आले नाही. सहाजिकच आता येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत मुद्दे वेगळे असले आणि निवडणुकीचा पोत वेगळा असला तरी शंभूराज देसाई यांना ही निवडणूक सहज सोपी जाणार नाही हे मात्र खरे आहे.
महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपात उद्धव ठाकरे यांनी हर्षद कदम या ताज्या दमाच्या शिवसैनिकाला उमेदवारी दिली आहे, तर हा मतदारसंघ परंपरागत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांना मानणार आहे. तर माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी राष्ट्रवादीची स्थापना झाल्या दिवशीच पाटणकर वाड्यातील राम मंदिरात बैठक घेऊन देशात सर्वप्रथम शरद पवार यांना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला होता. त्यांनी शंभूराज यांना पराभूत केले होते. शरद पवार यांची विश्वासू असाही विक्रमसिंह पाटणकर यांचा लौकिक आहे. मात्र, मुलगा सत्यजित पाटणकर यांना विजयी करण्यात त्यांना अद्यापही यश आलेले नाही.
विधानसभा निवडणुकीत सत्यजितसिंह पाटणकर यांनी नुकताच कार्यकर्त्यांचा मेळावा घेत त्यांची मते जाणून घेतली. त्यानंतर त्यांनी थेट अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या जागेची अदलाबदल केली गेली तर सत्यजितसिंह पाटणकर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतून निवडणूक लढवू शकतात. जर सत्यजितसिंह पाटणकर उद्धव ठाकरे शिवसेनेच्या मशाल या चिन्हावर निवडणूक लढवते झाले तर हर्षद कदम यांना थांबवले जाऊ शकते. मात्र, या शक्यता प्रत्यक्षात उतरल्या नाही, तर शंभूराज देसाई विरुद्ध सत्यजितसिंह पाटणकर विरुद्ध हर्षद कदम अशी लढत होणार हे नक्की.
या तिरंगी लढतीमध्ये सत्यजितसिंह पाटणकर यांच्या विजयाची शक्यता अधिक आहे. पाटांमध्ये नुकत्याच झालेल्या मेळाव्यात खासदार अमोल कोल्हे यांनी देखील यावेळेस पाटणमध्ये ‘सत्य’जित नक्की आहे असे म्हंटले आहे. जरी उबाठा कडून हर्षद कदम उभे राहिल्यास यात पाटणकरांपेक्षा त्यांना कमीच मते पडणार हे नक्की. निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांची मते सत्यजितसिंह पाटणकर यांना मिळणार आहेत. आणि हर्षद कदमांनी जर शिवसेनेची मते विभाजित करण्याचे काम केले तर त्याचा देखील फायदा पाटणकर यांना आपसूक होणार आहे.
तिरंगी लढत झाल्यास कुणाला फायदा?
जर शरदचंद्र पवार गटातून बाजूला होत अपक्ष म्हणून सत्यजितसिंह पाटणकर यांनी निवडणूक लढली आणि ते जिंकले तर ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीबरोबर राहतील यात शंका नाही. पाटण तालुक्यात कोणतीही निवडणूक असली कि त्यानिवडणुकीत देसाई आणि पाटणकर दोघांचेही कार्यकर्ते निवडणूक काळात आक्रमक होत असतात. या सगळ्यांचा विचार करता पाटण मतदारसंघ नक्कीच संवेदनशील आहे. मात्र, शरद पवार यांना २०१४ आणि २०१९ सालात हुलकावणी दिलेला हा मतदारसंघ पुन्हा ताब्यात घ्यायचा असेल तर तिरंगी लढत लढवणे फायद्याचे आहे. यामध्ये सत्यजितसिंह पाटणकर यांचे पुनर्वसन, शंभूराज देसाई यांचा पराभव, पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादी पवार गटाचे प्राबल्य मजबूत करणे यासारखे तीन विषय सत्यजितसिंह पाटणकर यांच्या विजयाने शरद पवार साध्य करू शकतात. यात शंका नाही.
मुंबईतील निर्णायक मतदानावर लक्ष केंद्रित
पाटण विधानसभा मतदारसंघातील जवळपास ४० हजार मतदार मुंबईत कामानिमित्त वास्तव्यास असल्याने मतदारसंघांची रणधुमाळी पाटणपुरती मर्यादित न राहता मुंबईपर्यंत प्रचाराचा धुरळा उडणार आहे. पाटणकर आणि देसाई गटांचे मुंबईतील कार्यकर्ते कामाला लागले असताना उद्धवसेनाही यात उतरली आहे. गेल्या अडीच वर्षांपासून पक्षाने मुंबईतील निर्णायक मतदानावर लक्ष केंद्रित केले आहे.
शिवसेना फुटीतील देसाईंची बंडाळी लोक अजूनही विसरलेले नाहीत
मुख्यमंत्री शिंदे यांच्या बंडात पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मोठी भूमिका बजावली होती. महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी शिवसेनेच्या आमदारांनी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली जे बंड केले, त्या घडामोडींमध्ये पाटणचे आमदार शंभूराज देसाई आघाडीवर होते. सुरतला ते पहिल्यांदा पोहोचले होते. तसेच नाराज आमदारांशी चर्चा करण्यातही शंभूराजेंचा पुढाकार होता. शंभूराजे सध्या मुख्यमंत्र्यांच्या सर्वात निकटचे मानले जातात. मात्र, ज्यावेळी देसाईनी बंडाळी केली तेव्हा त्यांचा हा निर्णय न पटलेले पाटणमधील अनेक शिवसैनिक उद्धवसेनेतच राहिले. त्यांचे नेतृत्व हर्षद कदम करत आहेत.
देसाई तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात
२०१४ आणि २०१९ मध्ये सलग दोन वेळा शिवसेनेच्या शंभुराज देसाईंनी राष्ट्रवादीच्या सत्यजित पाटणकरांचा पराभव केला. राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती सरकारच्या काळात मंत्रिपद असल्याने त्यांनी विकासनिधी मतदारसंघात आणला. यावेळेस तिसऱ्यांदा देसाई निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहरेत. मात्र, त्यांच्यावर मध्यंतरी झालेल्या शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी केलेल्या टीकेमुळे ते चांगलेच चर्चेत आले.
2019 चं समीकरण कसं होतं?
१) शंभुराज देसाई – 1 लाख 6 हजार 266 मतं
२) सत्यजित पाटणकर – 92 हजार