पुणे-दौंड अन् सातारा अशी मेमू सुरू करा; प्रवाशांनी केली रेल्वे बॉर्डकडे मागणी

0
1

सातारा प्रतिनिधी | पुणे विभागातून पुणे-दौंड आणि सातारा मार्गावर डेमू धावतात. तसेच डेमू १० डब्याची असून, जुनी झाल्यामुळे वारंवार बंद पडत आहे. याचा प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे पुणे विभागाला दोन मेमू मिळावी आणि पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी मागणी रेल्वे बोर्डाकडे करण्यात आली आहे.

पुण्यातून दौंड आणि सातारा-पुणे या मार्गावर डेमू धावतात. परंतु या डेमू जुन्या झाल्या आहेत. शिवाय डबे कमी असल्यामुळे जागा कमी पडत आहे. यामुळे या मार्गावर मेमू सुरू करावी, अशी मागणी सातत्याने प्रवाशांकडून करण्यात येत आहे. पुणे विभागाला मेमू मिळत नसल्यामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. यामुळे डेमूऐवजी मेमू सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहे.

बोर्डाकडून मेमू न मिळाल्यामुळे दौंड आणि सातारा मार्गावर जाणाऱ्या प्रवाशांना अडचणींना तोंड द्यावी लागत आहे. शिवाय यामध्ये काही डेमू जुन्या झाल्या आहेत. त्यामुळे रस्त्यामध्ये वारंवार बंद पडत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून प्रवास करणाऱ्यांचा वेळ वाया जात आहे. शिवाय दोन तीन तास मध्ये थांबावे लागत आहे. यामुळे प्रवाशांकडून मेमू सुरू करण्यासाठी मागणी करण्यात येत आहे.