कराड प्रतिनिधी । आयर्लंड येथील लिमरीक येथे नुकतीच जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत रिकर्व्ह गटात सातारा जिल्ह्यातील करंजे गावचा 19 वर्षीय पार्थ साळुंखे याने सुवर्णपदकाची जागतिक कामगिरी केली आहे. स्पर्धेत यश मिळवून पार्थ जुनिअर वर्ल्ड चॅम्पियन बनला आहे.
भारताने या स्पर्धेत ११ पदकांची कमाई केली असून सुवर्ण जिंकणारा पार्थ हा पहिला भारतीय ठरला. पार्थ फक्त एवढ्यावर थांबला नाही तर दुहेरीमध्येही त्याने भारताला पदक मिळवून दिले आहे. मिश्र दुहेरी गटात पार्थ बरोबर हरियानाची रिद्धी फोर या दोघांनी मिळून कांस्य पदकाची कमाई केली आहे. त्यामुळे आता पार्थने भारताला जागतिक स्पर्धेत दोन पदके जिंकून दिली आहेत.
स्पर्धेत यश मिळवलेला पार्थ साळुंखे हा हरियानामधील सोनिपथ येथे प्रशिक्षण घेत आहे. त्याचे तेथील प्रशिक्षक राम अवदेस यांच्या मार्गदर्शनात त्यांचा नियमित सराव असतो. त्याच्या या यशस्वी कामगिरीमुळे त्याची आरबीआयमध्ये वर्ग एक अधिकारी म्हणून निवड झाली आहे.
“https://twitter.com/hashtag/WorldArchery?src=hash&ref_src=twsrc%5Etfw”>#WorldArchery pic.twitter.com/rTDPYDCDBA
— World Archery (@worldarchery)
रँकिंग राऊंडमध्ये पार्थने 7 व्या मानांकित साँग इन जूनविरुद्धच्या ५ सेटच्या अटीतटीच्या सामन्यात ७-३ ( २६-२६, २५-२८, २९-२६, २९-२६, २८-२६) असा विजय मिळवला. २०१२ मध्ये पार्थच्या प्रशिक्षकाने अचानक त्याची साथ सोडली. वर्षभर पार्थकडे प्रशिक्षकच नव्हता आणि त्याचा खेळावर परिणाम झाला. त्यामुळेच त्याच्या वडिलांनी ही जबाबदारी घेतली. पार्थचे वडील किक बॉक्सर होते आणि त्यांनी यू ट्यूबवर तिरंदाजी शिकली आणि त्यानंतर मुलाला शिकवले. २०१८ च्या खेलो इंडिया स्पर्धेतील टॅलेंट स्काऊटची पार्थवर नरज पडली आणि तेथून तो साई सेंटरमध्ये गेला.