सातारा प्रतिनिधी | पाचगणी पोलीसांनी २४ तासाच्या आत गुन्हा उघड़कीस आणुन हिरेजडीत सोन्याच्या अंगठया हस्तगत केल्या आहेत. तसेच मोटर सायकल चोरीचे २ गुन्हे उघडकीस आणुन २ मोटर सायकली केल्या हस्तगत करून एकुण ३५ गहाळ मोबाईलचा शोध लावुन ५१ लाख रुपयांचा माल हस्तगत केला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दि.१०.०९.२०२४ रोजी सायं ७.३० वा.चे सुमारास शिवाजी चौक पाचगणी येथील लक्ष्मी स्टोअर समोर गॅँबरेल फ्रांसीस जोसेफ (रा. सिध्दार्थनगर पाचगणी ता. महाबळेश्वर) यांनी त्यांच्या मालकीची अंदाजे ५० हजार रुपये किंमतीची हिरो कंपनीची प्लेझर मोटर सायकल (क्रमांक एमएच ११सीपी ८८७८) ही पार्क केलेली. मोटर सायकल अज्ञात चोरटयाने चोरून नेल्याबाबत पाचगणी पोलीसठाणे अज्ञात चोरट्या विरूध्द दि.११.०९.२०२४ रोजी गु.र. नं.२२१/२०२४ भा.न्या.सं.कलम ३०३(२)प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्हयाचा तपास पाचगणी पोलीस ठाणे नेमणुकीचे पोलीस नाईक तानाजी शिंदे ब.क्र.९६२ हे करीत आहेत. तसेच दि.३०.०८.२०२४ रोजी सायंकाळी १९.३० ते १९.४५ वा. चे दरम्यान पाचगणी येथील अविराम मेडिकल येथे एकनाथ काशिनाथ पवार (रा.खिंगर ता. महाबळेश्वर) यांनी त्यांच्या मालकीची अंदाजे ४० हजार रूपये किंमतीची हिरोहोंडा कंपनीची सिडी डॉन मोटर सायकल (क्रमांक एमएच ११एसी २७१) ही पार्क केलेली मोटर सायकल अज्ञात चोरटयाने चोरून नेल्याबाबत पाचगणी पोलीस ठाणेअज्ञात चोरटया विरूध्द दि.१३.०९.२०२४ रोजी गु.र.नं. २२४/२०२४ भा.न्या. सं. कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्हयाचा तपास पाचगणी पोलीस ठाणे नेमणुकीचे पोलीसनाईक तानाजी शिंदे ब.क्र.९६२ हे करीत आहेत. दि.१२.०९.२०२४ रोजी सकाळी o९.०০ ते ०९.३० वा. चे दरम्यान पाचगणी येथील हॉटेलमध्ये मुक्कामी असलेले पर्यटकाचे हॉटेलचे रूममधुन ७० हजार रूपये किंमतीच्या हिरेजडीत सोन्याच्या दोनअंगठया चोरीस गेल्या होत्या. त्याबाबत फिर्यादी इंदुबेन जगदीश ठक्कर (रा. कांदीवली मुंबई) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पाचगणी पेलीस ठाणेस दि.१२.०९.२०२४ रोजी गु.र.नं.२२३/२०२४ भा.न्या.सं.कलम३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा तपास पोलीस हवालदार श्रीकांत कांबळे हे करीत आहेत.
सदर गुन्हयातील अज्ञात चोरटयाबाबत तसेच गेले मालाबाबत शोध लागावा याकरीता गुन्हयाच्या तपासाबाबत पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख ,अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडुकर , उप विभागीय पोलीस अधिकारी श्री.बाळासाहेब भालचिम सो यांनी दिलेल्या सुचनाप्रमाणे व केलेल्या मार्गदर्शना वरून पाचगणी पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी श्री.दिलीप पवारसहाय्यक पोलीस निरीक्षक, श्री.बालाजी सोनुने पोलीस उप निरीक्षक व तपासी अंमलदार पो.हवालदारश्रीकांत काबळे ब.क.१२८३. पो.ना.तानाजी शिंदे ब.क्र.९६२, तसेच पोलीस हवालदार विनोद पवारब.क्र.६४४, पो.कॉ.उमेश लोखंडे ब.क्र.९६२, पो. का. अमोल जगताप ब.क्र.७०० यांनी गुन्हा उघडकीस येण्याकरीता कसोशिने प्रयत्न करून हिरेजडीत अंगठीबाबत गुन्हा दाखल झाल्यानेतर २४ तासाच्या आत गुन्हयातील आरोपी माधव केशव लटपटे (वय २०, रा.कोदरी ता.गंगाखेड जि.परभरणी) यास अटककरून त्याच्याकडुन गुन्हयात गेलेल्या दोन्ही हिरेजडीत अंगठया असा एकुण 70 हजार रुपये किंमतीचा १०০ टक्के माल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच मोटर सायकल चोरीबाबत आरोपी प्रितमसुनिल शिंदे वय ३० रा.दामले आळी,गंगापुरी वाई ता.वाई जि.सातारा यास दि. १९.०९.२०२४ रोजीत्यास विश्वासात घेवुन त्याच्याकडे विचारपुस करता त्याने गुन्हयाची कबुली दिलेली आहे. सदरआरोपी याच्याकडुन वरील नमुद दोन्ही गुन्हयातील मोटर सायकल असा एकुण ९० हजार रूपयाचा माल हस्तगत करण्यात आला आहे.
चालु वर्षी सन २०२४ मध्ये पाचगणी परिसरातुन गहाळ झालेले मोबाईलचा शोधलागण्याकरीता विशेष प्रयत्न करून गहाळ झालेल्या मोबाईलपैकी ३५ मोबाईलचा शोध लावुनसंबंधीतांना त्यांचे मोबाईल देण्यात आले आहेत. सदर कारवाईमध्ये श्री.दिलीप पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक, श्री.बालाजी सोनुने पोलीस उप निरीक्षक व तपासी अंमलदार पोलीस हवालदार श्रीकांतकांबळे बक्र.१२८३. पो.ना.तानाजी शिंदे ब.क़र. १६२ तसेच पोलीस हवालदार विनोद पवार ब.क्र ६४४,पो.का.उमेश लोखंडे ब.क्र.७६२,पो.काँ. अमोल जगताप ब. क्र.9०० यानी सहभाग घेतला असुन त्यांनीकेलेल्या चांगल्या कामगिरीबाबत त्यांचे मा.पोलीस अधीक्षक श्री. समिर शेख यांनी अभिनंदन केले आहे.