चक्क ‘तो’ स्मशानभूमीत विकायचा ताडी; पोलीस आले अन् पुढं घडलं असं काही…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । एखादा बेकायदेशीर धंदा करायचं झालं कि तो पोलिसांना माहिती मिळणार नाही अशा ठिकाणी केला जातो. मग ते ठिकाण काय असेल याचा अंदाज देखील लावता येत नाही. परंतु, पोलीस त्यापर्यंत पोहचतातच. मात्र, समोर येत एक धक्कादायक दृश्य कि जे पाहून पोलिसही चक्रावून जातात. अशीच एक कारवाई पाचगणी पोलिसांनी केली. पाचगणी शहरात एकजण ताडी विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मात्र, ते ठिकाण पाहताच पोलिसही हादरले. पाचगणी येथील स्मशानभूमीत एक जण ताडी विकत असल्याचे पाहून पोलिसांनी त्यास रंगे हाथ पकडून मुद्देमालासह रोख रक्कम ताब्यात घेतली आहे. तसेच त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पाचगणी पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी की, बुधवारी पाचगणी येथील स्मशानभूमी परिसरात सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास सोमनाथ सुरेश पवार (वय 35, रा. आंबेडकर नगर, ता. वाई) हा प्लास्टिकच्या पोत्यात प्लास्टिकच्या पिशवीतील पांढरा द्रव पदार्थ असलेली उग्र वास असलेली ताडी विक्री करण्याच्या उद्देशाने स्वतःचे कब्जात बाळगल्याच्या स्थितीत पोलिसांना आढळून आला.

यावेळी पोलिसांनी पवारयांच्याकडे चौकशी करीत त्याच्याकडून पिशवीतील पांढरा द्रव पदार्थ असलेली उग्र वास ताडी, प्लास्टिकच्या 180 मिली बाटली आणी. रोख रक्कम रुपये 930 / असा एवज ताब्यात घेतली. तसेच त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 इ प्रमाणे कायदेशीर तक्रार दाखल केली.

यावेळी पोलिसांनी आरोपी पवार याच्याकडून पिशवीतील पांढरा द्रव पदार्थ असलेली उग्र वास ताडी, प्लास्टिकच्या 180 मिली बाटली आणि रोख रक्कम रुपये 930 असा एवज ताब्यात घेतला. याबाबत सहाय्यक पोलीस फौजदार भोसले यांनी पाचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास पांचगणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक कांबळे हे करीत आहेत.