सातारा प्रतिनिधी । तृतीयपंथीय व्यक्तींचे हक्कांचे संरक्षण व कल्याण या योजनेंतर्गत सातारा जिल्ह्यातील तृतीयपंथीय व्यक्तींना विहीत नमुन्यात प्रमाणपत्र/ओळखपत्र उपलब्ध करून दिले जाणार आहे. यासाठी सातारा जिल्ह्यातील तालुकास्तरावर समाज कल्याण विभागाच्या वतीने विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
समाज कल्याण विभागाच्या वतीने सातारा जिल्ह्यातील ११ तालुक्यात हे शिबीर घेण्यात येणार आहे. त्यामध्ये पाटण तालुका दि. 13 फेब्रुवारी, कोरेगाव दि. 16 फेब्रुवारी, माण दि. 21 फेब्रुवारी, खटाव दि. 23 फेब्रुवारी, वाई दि. 27 फेब्रुवारी, जावली दि. 1 मार्च, महाबळेश्वर दि. 5 मार्च, फलटण दि. 12 मार्च, खंडाळा दि.19 मार्च, कराड दि. 22 मार्च, सातारा दि. 27 मार्च असे शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
सातारा जिल्ह्यातील जास्तीत जास्त तृतीयपंथी व्यक्तींनी संबंधित तालुक्यातील गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांचे कार्यालयात आवश्यक त्या कागदपत्रांसह उपस्थित रहावे, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त नितीन उबाळे यांनी केले आहे.
अर्ज भरण्याकरीता लागणार ‘ही’ आवश्यक कागदपत्रे
1) आयडेंटी साईज फोटो, 2) आधारकार्ड (ओरिजनल), 3) रेशनकार्ड, 4) प्रतिज्ञापत्रावर रु.10 /- तिकीट लावणे, 5) अर्जदाराचा मोबाईल नंबर, 6) ईमेल आयडी असणे आवश्यक असणार आहे.