सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाल्याने धरणातून सिंचनासाठी पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक धरणांनी तळ गाठला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक धरणातील पाणीसाठा कमी झाला आहे. उरमोडी धरणात तर २० टक्केच पाणीसाठा राहिला आहे.तर कोयना धरणात ५३ टीएमसी पाणी शिल्लक असल्याने समाधानाची स्थिती आहे. दरम्यान, सध्या प्रमुख सहा धरणांत ६९ टीएमसी साठा असून, तो गतवर्षीपेक्षा कमीच आहे.
सातारा जिल्ह्यात कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडी, अशी प्रमुख धरणे आहेत. जिल्ह्याच्या पश्चिम भागात पर्जन्यमान अधिक होते. त्याच भागात ही धरणे असल्याने दरवर्षी ओसंडून वाहतात; पण गेल्यावर्षी संपूर्ण जिल्ह्यातच पाऊस कमी झालेला. त्यामुळे बहुतांशी धरणे भरली नाहीत. पाऊस कमी झाल्याने गेल्यावर्षीच्या नोव्हेंबर महिन्यापासून दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती.
पाटण तालुक्यातील कोयना धरणाच्या पाण्यावर सांगली जिल्ह्याचा वाटा अधिक आहे. त्यामुळे सांगलीसाठी मागणीनुसार सिंचनाकरिता पाणी विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यात कडक उन्हाळा सुरू आहे. त्यातच दुष्काळी स्थिती असल्याने आगामी काळातही पाण्याला मोठी मागणी राहणार आहे. त्यामुळे आगामी दोन महिन्यांत पाण्याचा वापरही वाढणार आहे.
जिल्ह्यातील धरण पाणीसाठा (टीएमसीमध्य
धोम धरणाची पाणी साठवण क्षमता १३.५० इतकी असून सद्या ६.३७ टीएमसी इतका पाणीसाठा आहे. कण्हेर धरणात पाणी साठवण क्षमता १०.१० इतकी असून ३.४८ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे.
कोयना पाणी साठवण क्षमता १०५.२५ असू ५२.९६ टीएमसी इतका पाणीसाठा शिल्लक आहे.
बलकवडी धरणाची पाणी साठवण क्षमता ४.०८ असून १.२४ इतका टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे. उरमोडी धरणाची पाणी साठवण क्षमता ९.९६ असून १.९९ इतका पाणीसाठा झाला आहे. तारळी धरणाची पाणी साठवण क्षमता ५.८५ असून ३.३३ इतका टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे.