कराड प्रतिनिधी | जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने वार करून एकाचा खून करण्यात आला आहे. यामध्ये दोघेजण गंभीर जखमी झाले असल्याची घटना कराड तालुक्यातील म्होप्रे गावात बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेनंतर तिघांवर कराड ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रकाश बाबुराव सकपाळ-पाटील (वय ६०) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून किशोर सकपाळ-पाटील, किरण सकपाळ-पाटील हे दोघेजण हलल्यात जखमी झाले आहेत. तर रणजीत जाधव (रा. गोळेश्वर, ता. कराड), अनिल सकपाळ, सुनील सकपाळ अशी संशयीतांची नावे आहेत.
याबाबत घटनास्थळावरून तसेच पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कराड तालुक्यातील म्होप्रे गवात राहत असलेल्या प्रकाश सकपाळ-पाटील आणि अनिल सकपाळ या दोघांच्यात जमिनीचा वाद होता. बुधवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास प्रकाश सकपाळ-पाटील हे म्होप्रे गावातील बसथांब्याजवळ थांबले होते. त्यावेळी त्याठिकाणी संशयित तिघेजण आले. त्या तिघांपैकी एकाने प्रकाश सकपाळ-पाटील यांच्याशी जमिनीच्या कारणावरून वाद घालण्यास सुरुवात केली. पुढे या वादच रूपांतर त्यांच्यात धक्काबुक्की झाली. त्यावेळी संशयतांनी त्यांच्यासोबत आणलेल्या धारदार शस्त्राने प्रकाश यांच्यावर हलला करीत भोकसले.
तसेच त्याठिकाणी असलेल्या किशोर व किरण सकपाळ-पाटील या दोघांवरही शस्त्राने वार केले. घटनेची माहिती कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात देण्यात आली. रात्री पोलीस त्याठिकाणी दाखल झाले. त्यांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. याप्रकरणी तिघांवर कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक रात्री उशिरापर्यंत कराडात…
म्होप्रेत तिघांवर झालेल्या खुनी हल्ल्यामुळे म्होप्रे, साकुर्डी परिसरात एकच खळबळ उडाली. तिन्ही संशयितापैकी एकजण गोळेश्वर गावातील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर रात्री गोळेश्वर गावातील तरूणांनी कराड ग्रामीण पोलीस ठाणे गाठले. घटनेदिवशीच कराड शहर पोलीस ठाण्याची तपासणी होती. त्यासाठी खुद्द पोलीस अधीक्षक समीर शेख हे रात्री उशिरापर्यंत कराडमध्ये होते. त्यामुळे कराड ग्रामीण पोलिसांची मोठी धावपळ उडाली.
रुग्णालयात ग्रामस्थ, नातेवाईकांची मोठी गर्दी
चाकूने भोकसल्याने गंभीर जखमी झालेल्या प्रकाश संकपाळ यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला. यामुळे वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात ग्रामस्थ आणि नातेवाईकांची मोठी गर्दी झाली होती.