वाई MIDC परिसरात पूर्व वैमस्यातून गोळीबार; एकजण जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील वाईच्या एमआयडीसीत पूर्व वैमनस्यातून गोळीबार झाला असून गोळीबारात एकजण जखमी झाल्याची घटना सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. गोळीबाराच्या घटनेत एक युवक जखमी झाला असून त्याला वाई ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवारी दि. २४ रोजी रात्री आठ वाजता अक्षय निकम याने जून्या भांडणाचा राग मनात धरून अमन सय्यद (वय २६ वर्षे) रा. बोपर्डी याच्यावर एमआयडीसीतील चांदणी चौकात पानपट्टी जवळ बसलेला असताना आपल्या मित्रासमवेत दुचाकीवरून येऊन गोळीबार केला.

सुदैवाने गोळी हाताला चाटून गेली. गोळीबारात अमन सय्यद हा जखमी झाला असून त्याला वाई ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या सह पोलीस दाखल झाले. यावेळी उपाधीक्षक बाळासाहेब भालचिम, वाईचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी घटनेची व संशियिताची माहिती घेतली.