सातारा प्रतिनिधी | सातारा तालुक्यातील केळवली धबधबा प्रवाहित झाला आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटक येत आहेत. रविवारी देखील पर्यटकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली होती. दरम्यान, येथील धबधब्यामध्ये रविवारी दुपारच्या सुमारास एक युवक बुडाल्याची घटना घडली. संबंधित युवक धबधबा पाहण्यासाठी तेथे आपल्या मित्रांसमवेत गेला होता.
याबाबत अधिक माहिती अशी की, केळवली येथे रविवारी मित्रांसोबत धबधबा पाहण्यासाठी आलेला एक युवक बुडाल्याची घटना घडली. या घटनेची माहिती शिवेंद्रराजे रेस्क्यू टीम तसेच तालुका पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी तत्काळ दाखल झाले.
यावेळी तालुका पोलीस व शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमकडून बुडालेल्या युवकाचे धबधब्यामध्ये शोधकार्य राबविण्यात आले.धबधब्यातून पडणाऱ्या पाण्याचा वेग जास्त असल्याने शोध मोहीम राबविण्यात टीमला अडचणी येत होत्या. सायंकाळपर्यंत सरकारी संबधित युवक सापडला नसल्याने त्याचे शोधकार्य सुरूच होते.