सातारा प्रतिनिधी | पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर आनेवाडी टोलनाक्याजवळच असलेल्या रायगाव फाटा येथे एक भीषण अपघाताची घटना घडली. रुग्णवाहिका आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरची भीषण धडक होऊन छत्रपती शिवेंद्रराजे भोसले रेस्क्यू टीमचे सदस्य संतोष पवार (वय २८) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
दि. ५ रोजी ही रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. पवार हे पुणे येथे रुग्ण सोडून साताऱ्याच्या दिशेने येत असताना ही दुर्दैवी घडली. या घटनेची माहिती मिळताच सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.
संतोष पवार यांना सामाजिक कार्याची आवड असल्याने ते गेली १० वर्ष छत्रपती शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमचे सदस्य होते. रेस्क्यू टीम करीत असताना त्यांनी अनेक जणांचे जीव वाचवले होते.