सातारा प्रतिनिधी | घरातील गॅस कनेक्शन महिलेच्या नावावर नसेल तर त्या कुटुंबाला राज्य शासनाने जाहीर केलेल्या अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेता येणार नाही. केंद्र सरकारच्या उज्ज्वला योजनेचा लाभ घेतलेल्या व लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या अशा दोन निकषांनुसार जिल्ह्यातील एकूण 1 लाख 37 हजार गॅस कनेक्शनधारकांना वर्षातून तीन मोफत सिलिंडरचा लाभ मिळणार आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेनंतर महाराष्ट्रात आणखी एक योजना लागू केली असून पात्र कुटुंबांना वर्षातील तीन एलपीजी गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत. त्याचा जिल्ह्यातील 1 लाख 37 हजार महिलांना लाभ होऊ शकतो.
केंद्र सरकारच्या पंतप्रधान उज्ज्वला योजनेचा आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणार्या लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे. जिल्ह्यात 8 लाखांहून अधिक लाडक्या बहिणींची नोंदणी झाली असून त्यापैकी फक्त दीड लाख गॅस कनेक्शन हे उज्ज्वला योजनेंतर्गत आहेत. त्यामुळे एवढ्याच कुटुंबांना तीन मोफत गॅस सिरलेंडर मिळतील.