पुणे-बंगळुरू महामार्गावर एकमेकांना खुन्नस देत नचवल्या तलवारी; पुढं घडलं असं काही…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात रात्रीच्यावेळी उशिरापर्यंत डीजेच्या ठेक्यावर रस्त्यावर तरुण नव्हतं असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. दरम्यान, यावेळी अनुचित प्रकार देखील घडत आहेत. अशीच धक्कादायक घटना गुरुवारी रात्री पुणे-बेंगळुरू महामार्गावर सातारा येथे घडली. गुरुवारी रात्री डीजेच्या दणदणाटात गौरीशंकर कॉलेज परिसरात व्यावसायिकांसह दोन गट आमने-सामने आले. यावेळी दोन्ही गटाकडून एकमेकांना खुन्नस देत तलवारी नाचवण्यात आल्या. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच सातारा ग्रामीण पोलिसांनी धरपकड करत सहा जणांना अटक केली. या प्रकरणी ३० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून ७ जणांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे – बेंगळुरू महामार्गावरील गौरीशंकर कॉलेज परिसरात गुरुवारी रात्री दोन गट आमने-सामने आले. “माझ्या डॉल्बीचा आवाज मोठा की तुझ्या डॉल्बीचा आवाज मोठा”, अशी खुन्नस देत दोन्हीही गटांनी डीजेचा दणदणाट सुरू केला. यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. दोन्ही गट एकमेकांना तलवारीचा धाक दाखवून खुन्नस देत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.

पुणे-बंगळुरू महामार्गावर सुमारे अर्धा तास हा धुडगूस सुरू होता. नाचणाऱ्या काही तरूणांनी पिस्तूल, कोयते आणि तलवारी देखील नाचवल्या. कोणीतरी या प्रकाराची माहिती सातारा तालुका पोलिसांना दिली. पोलिसांनी रात्रभर धरपकड करून सहा जणांना अटक केली असून एकूण ३३ जणांवर विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सातारा तालुका पोलिसांनी ३० जणांवर गुन्हा दाखल केला असून, दोन्ही गटातील ७ तरुणांना अटक केली आहे.