‘कराडकरांनो रोज चाला अन् आपल्या हृदयाला जपा’…’त्यांनी’ दिला अनोखा संदेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । आज जागतिक हृदय दिन असून हृदय आणि रक्त वाहिन्यासंबंधी रोगांचं निवारण आणि त्यांचे परिणाम याबद्दल जनजागृती करण्यासाठी दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. या दिनाचं औचित्य साधून कराड पालिका कर्मचाऱ्यांच्या वतीने आज रॅली काढत कराड शहरातील नागरिकांना अनोखा संदेश देण्यात आला. ” कराड शहरातील नागरिक हो दररोज चाला आणि आपले ह्रदय उत्तम ठेवा,” असे कर्मचाऱ्यांनी यावेळी सांगितले.

“स्वच्छता पंधरवडा” व “स्वच्छता ही सेवा” या अभियान अंतर्गत कराड पालिका व सह्याद्री हॉस्पिटल यांच्यावतीने जागतिक हृदय दिननिमित्त आज कराड शहरात सकाळी 6.30 वाजता पायी चालत रॅली काढण्यात आली. आजच्या काळात हृदयविकाराच्या घटना झपाट्याने वाढत आहेत. अनेक लोकांचा हृदयविकारामुळे मृत्यू झाला आहे. हल्ली प्रत्येकाची जीवनशैली पूर्णपणे बिघडली आहे. त्यामुळे हृदयविकाराच्या आजाराला सामोरे जावे लागते. त्यामुळे यापासून लांब राहावे म्ह्णून आजचा दिवस साजरा केला जातो.

कराड श्रयातून काढण्यात आलेल्या या रॅलीमध्ये कराड पालिकेचे जलनिस्सारन अधिकारी ए. आर. पवार, आरोग्य अभियंता आर. डी. भालदार, कराड पालिकेतील सर्व अधिकारी व कर्मचारी पर्यावरण प्रेमी,नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

हृदय रोग टाळण्यासाठी ‘हे’ करणे गरजेचे’

हृदय रोग टाळायचा असेल तर काही गोष्टी करणे गरजेच्या आहेत. गरजेपेक्षा फास्ट फूड जास्त खाणे टाळावे, साखर-मीठ व चरबीयुक्त पदार्थांचे अतिसेवन करू नये, कोणत्याही गोष्टीचा मानसिक ताण घेउ नये त्या ऐवजी भरपूर व्यायाम करावा, भरभर चालणे, धावणे, पोहणे, सायकल चालवने यासारखा व्यायाम करावा. ज्यांना हृदयविकार आहे, त्यांनी डॉक्टरच्या सल्ल्यानुसार व्यायम करावा. तसेच योगात ध्यान, समाधी (मेडिटेशन) आणि यम, नियम, योगासने, प्राणायाम यांचा समावेश होतो.

जागतिक हृदय दिनाचा असा आहे इतिहास

लोकांना जागतिक हृदय दिनाविषयी माहिती असणं खूप महत्वाचं आहे, कारण लोकांमध्ये हृदयविकाराचा झटका आणि हृदयाशी संबंधित आजारांबद्दल जागरूकता कमी आहे. १९९८ मध्ये इंटरनॅशनल सोसायटी ऑफ कार्डिओलॉजी इंटरनॅशनल कार्डिओलॉजी फेडरेशनमध्ये विलीन झाल्यानंतर वर्ल्ड हार्ट फेडरेशन (WHF) अस्तित्वात आले. प्रोफेसर अँटोनियो बायस डी लूना हे १९९७ ते १९९९ पर्यंत WHF चे अध्यक्ष होते. त्यांनीच जागतिक हृदय दिन साजरा करण्याची कल्पना मांडली. पहिला जागतिक हृदय दिन २४ सप्टेंबर २००० रोजी साजरा करण्यात आला. २०११ पर्यंत सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या रविवारी हा दिन साजरा केला जात होता. परंतु २०१२ पासून तो २९ सप्टेंबरला साजरा करण्यात येऊ लागला.

भारतामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू

भारतामध्ये 2019 च्या तुलनेत 2021 मध्ये हृदयविकाराच्या झटक्यानं होणाऱ्या मृत्यूंमध्ये लक्षणीय वाढ झाली नाही. 2021 मध्ये हृदयविकाराच्या झटक्यानं होणाऱ्या मृत्यूंची संख्या 2019 च्या तुलनेत 1.6 टक्क्यांनी अधिक होती. तसेच यामुळं मृत्यू झालेल्यांची संख्या 2020 च्या तुलनेत 2021 मध्ये हृदयविकाराचा झटका कमी होता. 2017 ते 2021 या कालावधीत हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू होण्याचं प्रमाण 22 टक्क्यांनी वाढलं आहे. एनसीआरबीच्या म्हणण्यानुसार, 2012 ते 2021 या 10 वर्षांत हृदयविकाराच्या झटक्यानं होणाऱ्या मृत्यूंमध्ये 54 टक्क्यांनी वाढ झाली आहे.