सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात 19 ते 28 सप्टेंबर कालावधीत गणेशोत्सव व 28 सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलाद सण साजरा करण्यात येणार आहे. या दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने घातलेल्या निर्बंधांचे पालन व्हावे. या करिता पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 नुसारचे अधिकारा नुसार दि. 28 सप्टेंबर 2023 पर्यंत कालावधीकरिता अधिकार प्रदान केले आहेत. या करिता कलम 36 लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या अनुषंगाने मिरवणूक कोणत्या मार्गाने व कोणत्या वेळी काढावी किंवा काढू नये. मिरवणुकीतील व्यक्तींचे वर्तन कसे असावे, मिरवणुकीच्या व जमावांच्या प्रसंगी कोणत्याही रस्त्यावरुन किंवा सार्वजनिक जागी किंवा सार्वजनिक गर्दी होणार असेल किंवा अथडळा होणार असेल अशा सर्व प्रसंगी अडथळा होऊ न देणे. ढोल, ताशे इतर वाद्ये वाजवण्याचे विनियमन करुन नियंत्रण आणि ध्वनी प्रदूषणाचे अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने घातलेल्या निर्बंधांचे पालन व्हावे.
अधिकारानुसार त्या- त्या पोलीस ठाणे हद्दीतील जनतेचे स्वास्थ्य, सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहावी. त्याकरिता मोटार वाहनाच्या नियमना संदर्भात, कार्यक्रमासाठी जाणारे-येणारे मार्गातील व्यक्ती अथवा व्यक्तींच्या समुहाचे वर्तन/ हालचाल कशी असावी. ध्वनी प्रदूषणाचे अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या निर्बंधाचे अथोचित पालन व्हावे. या दृष्टीने आवश्यक असणारे सर्व निर्देश देण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. तसेच सार्वजनिक वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही अश प्रकारे कमानी, मंडप, विद्युत रोषणाई, कट आऊटस्, जाहिराती उभारण्यासाठीही कलम 36 अन्वये सातारा जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना योग्य त्या अटी व शर्तींवर संबंधितांना परवानगी देण्यास प्राधिकृत केले आहे.