विधानसभेला पहिल्या दिवशी 6 अर्ज दाखल; फलटण, कोरेगावातून 2 तर कराड उत्तर अन् साताऱ्यातून एक अर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । राज्यातील सर्व विधानसभा संघासाठी निवडणुकीसाठी काल मंगळवारपासून नामनिर्देशनपत्र भरण्यास सुरुवात झाली. काही इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज खरेदी केले तर काहींनी प्रत्यक्ष भरले देखील. मात्र, यामध्ये चर्चेत राहिलेले इच्छुक उमेदवार अभिजित बिचुकले यांनी देखील काल आपला उमेदवारी अर्ज भरला. त्यांच्यासह पहिल्याच दिवशी ६ नामनिर्देश अर्ज दाखल झाले. यामध्ये फलटण मतदारसंघासाठी दोन, कोरेगावसाठी दोन, कराड उत्तर १, सातारा मतदारसंघासाठी १ अशी एकूण ६ नामनिर्देशनपत्र दाखल झाली आहेत. काल दिवसभरात जिल्ह्यातून २२६ अर्जाची विक्री झाली.

सातारा येथे पहिल्या दिवशी वसंत मानकुमरे, आ. शिवेंद्रराजे भोसले आणि वेदांतिकाराजे भोसले, रिपाइंचे दादासाहेब ओव्हाळ, अभिजित बिचुकले, सागर भिसे आदी १३ जणांनी १६ जणांसाठी एकूण २९ अर्ज खरेदी केले. यांपैकी सातारा विधानसभेसाठी सागर शरद भिसे यांनी अर्ज भरला.

पाटणला पहिल्या दिवशी १४ जणांनी २५ अर्जाची खरेदी केली. मात्र, एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात अधिकराव दिनकर पवार, रा. गोटे (ता. कराड) यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. पहिल्या दिवशी १५ जणांनी एकूण २३ नामनिर्देशनपत्रे घेतली. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात पहिल्या दिवशी एकूण २५ जणांनी ३० नामनिर्देशनपत्रे घेतली.

कोरेगाव मतदारसंघात महेश माधव कांबळे. रा. महागाव आणि ऋषिराज जगन्नाथ कणसे, रा. अंगापूर वंदन यांनी अपक्ष अर्ज भरले. एकूण ४३ अर्जाची विक्री झाली. फलटण विधानसभा मतदारसंघासाठी २३ उमेदवारी अर्जाची विक्री झाली. विडणी येथील हरिभाऊ रामचंद्र मोरे व सांगवी येथील रवींद्र रामचंद्र लांडगे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले.

माण विधानसभा मतदारसंघातून पहिल्या दिवशी एकूण ३५ जणांनी २५ अर्ज नेले. तथापि, आज कोणी अर्ज भरला नाही. माण विधानसभा मतदारसंघातून पहिल्या दिवशी एकूण ३५ जणांनी २५ अर्ज नेले. तथापि, आज कोणी अर्ज भरला नाही. वाई मतदारसंघातून १८ जणांनी २१ अर्ज नेले.