देवदर्शनाला जाताना Omni Car झाडावर आदळली; अपघातात 3 जण जागीच ठार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील धोंडेवाडी, ता. खटाव येथील पेट्रोल पंपानजिक सूर्याचीवाडी हद्दीतीतून देवदर्शनासाठी निघालेली ओमिनी कार झाडावर आदळून भीषण अपघात झाला. यामध्ये 3 जण जागीच ठार झाले असून चौघेजण गंभीर जमखी झाले असल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास घडली.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील सिद्धेश्वर कुरोली येथील पांडुरंग देशमुख यांच्या ओमिनी कारमधून कुरोली व बनपुरी येथील भाविकांना लाकरेवाडी येथे देवदर्शनासाठी घेऊन जात असताना पहाटेच्या वेळेस खटाव तालुक्यातील धोंडेवाडीजवळील सुर्याजीवाडी हद्दीत कार आली. यावेळी कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे कार रस्त्या कडेच्या झाडावर जाऊन जोरात आदळली.
या भीषण अपघातात तीनजण जागीच ठार झाले तर चौघेजण गंभीर जखमी आहेत.

अपघाताचे वृत्त समजताच वडूज पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी रूग्णालयात पाठवून दिले. अपघातात ठार व जखमी झालेल्यांची नावे अद्याप स्पष्ट झाली नाहीत, मात्र, हे सर्वजण बनपुरी व कुरोली येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. सदर अपघात पहाटेच्या वेळेस कार चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे झाला असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या अपघाताचा तपास वडूज पोलीस करत आहेत.