सातारा प्रतिनिधी । पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी घाटात एक ऑईल घेऊन निघालेल्या टॅकरमधून अचानक ऑईलची गळती सुरू झाली. त्यामुळे रस्त्यावर सर्वत्र ऑइल पसरल्यामुळे घाट रस्त्यावरील वाहतूक सुमाराने चार तास ठप्प झाली होती. वाहनांच्या एकामागून एक रांगा लागल्याने रविवारी सुट्टीच्या दिवशी हि घटना गळ्याने वाहनधारकांना नाहक त्रास शान करावा लगला.
याबाबत ऐहिक माहिती अशी की, याबाबत अधिक माहिती अशी, रविवारी दुपारी चारच्या सुमारास तेल घेऊन जाणारा टँकर (क्रमांक एमएच ०४ एचएस ६८४४) हा खांबाटकी घाटातील श्री नाथ मंदिराजवळील वळणावर आला. या वळणावर मोठा चढ असल्याने टँकरमधील ऑइल झाकणातून सांडू लागले. त्यामुळे तो टैंकरही रस्त्यावरून घसरू लागला.
चालकाने तिथेच टँकर थांबवल्यामुळे टँकरमधील बरेचसे तेल रस्त्यावर वाहू लागले. तेल रस्त्यावर पसरल्याने वाहनांचे टायर घसरू लागले. अनेक दुचाकीस्वार निसरड्या रस्त्यामुळे घसरून पडले. या घटनेची माहिती कळताच खंडाळा पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी काही काळ वाहतूक थांबवली. अपघातग्रस्त टँकर बाजूला काढून रस्त्यावरील ऑईलवर माती टाकत एक लेन वाहतुकीसाठी सुरू केली.
तेल सांडल्याने रस्ता निसरडा झाला. वाहने बाजूने सावकाश चालवा. दुचाकीवर एकट्याने सावकाशे जा, अशा प्रत्येक वाहनचालकास पोलिस सूचना देत होते. मात्र काही दुचाकी व चारचाकी वाहनचालक मनमानी करत सूचना नं पाळता वाहने विचित्र पद्धतीने चालवत् होते. त्यामुळे वाहने घसरत होती. इतर वाहनांची अडचण होत होती. सुमारें १५ ते २० दुचाकीस्वार या निसरड्या रस्त्यावर घसरून पडले. याची माहिती खंडाळा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शेळके भुईंज पोलिस ठाण्याचे सपोनी रमेश गर्जे तसेच जोशी विहीर येथे असणाऱ्या महामार्ग पोलिस मदत केंद्रचे सपोनी वंजारे यांना समजताच यांची पोलिस पथके तातडीने घटना स्थळावर दाखल झाली.
त्यानंतर येथील वाहतूक सुरळीत करण्यासाठी ऑईल पडलेला घाट रस्ता हा पाण्याचा मारा करून धुवून काढल्या नंतरच हि वाहतूक सुरळीत करण्यात आली. खंडाळा पोलिस ठाण्याचे शेळके सर्व पोलिस अधिकारी आणी कर्मचारी भुईंज पोलिस ठाण्याचे सपोनी रमेश गर्जे पोलिस अधिकारी व कर्मचारी तसेच महामार्ग पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तब्बल पाच तास परिश्रम घेवून घाटातील वाहतूक सुरळीत केली.