बोरगाव पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांचा विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारींच्या हस्ते पुरस्काराने सत्कार

0
314
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या हस्ते जानेवारी ते डिसेंबर 2024 या कालावधीत उल्लेखनीय कार्यगिरी करणाऱ्या पोलिस ठाण्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. यामध्ये सातारा जिल्ह्यातील बोरगाव पोलिस ठाण्याला “Best Police Station in Muddemal Disposal” आणि “Best Police Station in Crime Direction” हे दोन प्रतिष्ठित पुरस्काराने फुलारी यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

बोरगाव पोलिस ठाण्याच्या कामकाजाच्या उत्कृष्टतेमुळे या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली बोरगाव पोलिस ठाण्याचे काम अतिशय प्रभावी ठरले. सर्व बोरगाव डीबी टीमचे हे विशेष यश कार्यक्षमतेचे आणि उत्कृष्टतेचे प्रतीक ठरले आहे.

बोरगांव पोलीस ठाणेचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. डी एस वाळवेकर व महीला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती स्मिता पाटील यांच्यासह बोरगाव पोलीस ठाणेचे पोलीस अंमलदार पो.ना. प्रशांत चव्हाण, पो. ना. दिपककुमार मांडवे, पो. काँ. सतिश पवार पो. काँ. अतुल कणसे पो काँ केतन जाधव व सायबर पोलीस ठाणेचे पो. काँ. महेश पवार यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.