साताऱ्यातील साहित्य संमेलनाबाबत पदाधिकाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट; फडणवीसांनी दिलं ‘हे’ आश्वासन

0
114
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | साताऱ्यात होणाऱ्या ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत असून संमेलनाचे स्वागताध्यक्ष सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेऊन या संमेलनासंदर्भात आणि मराठी भाषेच्या विविध प्रश्नांबाबत चर्चा केली. यावेळी चर्चेनंतर संमेलनास सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

मसाप शाहूपुरी शाखा आणि मावळा फाउंडेशनच्या वतीने साताऱ्यात ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत असून त्याची जोरदार तयारी सुरू आहे. संमेलनाच्या आयोजनातील महत्त्वाच्या गोष्टींबाबत चर्चा करण्यासाठी संमेलनाचे स्वागताध्यक्ष सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांची मुंबईत भेट घेतली. यावेळी त्यांच्या समवेत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कार्यवाह सुनीताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, मसाप शाहूपुरी शाखेचे उपाध्यक्ष विक्रम पाटील, महेश सोनावणे, उद्योजक प्रसन्न देशमुख, अमोल मोहिते, अक्षय गवळी, मसाप शाहूपुरी शाखेचे सदस्य राजेश जोशी, वेदांत जोशी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनामुळे संमेलनाची तयारी गतिमान होणार आहे. दरम्यान, साहित्य संमेलनाच्या इतिहासात पिता आणि पुत्र स्वागताध्यक्ष होण्याचा योग ९९ व्या संमेलनात जुळून आला आहे, अशी माहिती विनोद कुलकर्णी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिली. यावर श्री. फडणवीस यांनी मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांचे अभिनंदन केले.