कराड प्रतिनिधी । राष्ट्रवादी ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर यांच्या नेतृत्वाखाली ‘बहुजन जुडेगा देश बढेगा’ हा नारा देत १४ लोकसभा मतदार संघ, ९३ तालुके, ६७ विधानसभा मतदार संघ अशी २५०० किलोमीटरची बाईक रॅली काढण्यात आली आहे. दरम्यान, आज ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राजापूरकर हे आपल्या रॅलीसह राष्ट्रवादी कोंग्रेसचे सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या कराड येथील निवासस्थानी पोहचले. या ठिकाणी राजापूरकर यांनी खा. श्रीनिवास पाटील यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली.
यावेळी पक्षाचे राज्य विस्तारक श्री. सलिम बेग, सातारा जिल्हाध्यक्ष श्री.विजय बोबडे, असंघटित कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष श्री.संतोष ननावरे, कराड तालुका अध्यक्ष श्री.प्रकाश चव्हाण, उपाध्यक्ष श्री.निलेश मोहिते उपस्थित होते.
खा. श्रीनिवास पाटील यांची भेट घेतल्यानंतर त्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला मिळालेल्या तुतारीवाला माणूस या चिन्हाच्या झेंड्याचे अनावरण करण्यात आले. केंद्रीय निवडणूक आयोगाने काल हे चिन्ह खासदार शरद पवार यांच्या गटाला दिले असून त्यांचा गट या चिन्हावर निवडणूक लढवणार आहे. हे चिन्ह घेऊन राष्ट्रवादी ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर यांच्या नेतृत्वाखाली ‘बहुजन जुडेगा देश बढेगा’ हा नारा देत १४ लोकसभा मतदार संघ, ९३ तालुके, ६७ विधानसभा मतदार संघ अशी २५०० किलोमीटरची बाईक रॅली काढण्यात येणार आहे.