सातारा अप्रतिनिधी । मुंबईतील घाटकोपरमध्ये घडलेल्या घटनेनंतर राज्य शासनाकडून धोकादायक फ्लेक्सवर कारवाई करण्याचे आदेश पालिका प्रशासनांना दिले आहेत. त्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी संपूर्ण वाई शहरातील पालिका प्रशासनाने चौका-चौकात लावलेले धोकादायक जाहिरातींच्या अनधिकृत फ्लेक्स बोर्डवर वाई नगरपरिषदेच्या वतीने नुकतीच कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत अनधिकृत ३९ होर्डिंग व १५ मोबाईल टॉवर्सनासुद्धा हटविण्याच्या नोटिसा देण्यात आले.
वाई पालिका प्रशासनाने वाई शहरातील पालिकेची परवानगी न घेता लावलेले व धोकादायक झालेल्या दहा होर्डिंग्जवर कारवाई करण्यात आली होती. पालिकेची ही कारवाई अजून दोन दिवस राबविण्यात येणार असून व्यावसायिकांनी आपले जाहिरातीचे फ्लेक्स स्वतःहून काढून घेण्यात यावेत, असेही आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आलेले आहे.
वाईच्या किसनवीर चौकात, गणपती घाटावर, शिवाजी चौक, वाई एसटी स्टँड परिसरात लावलेल्या जाहिरातीच्या फ्लेक्स बोर्डवर कारवाई करण्यात आली. व्यावसायिकांनी लावलेल्या नव्या जाहिरातीच्या फ्लेक्स बोर्डमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून वाई शहराला लागलेल्या भल्या मोठ्या फ्लेक्स बोर्डमुळे शहराचे विद्रुपीकरण झाल्याचे निष्पन्न झाले होते. सोमवारी मोहिमेच्या पहिल्याच दिवशी अशा सर्व व्यावसायिकांच्या होर्डिंग्जवर कारवाई करण्यात आली.
अतिक्रमण कारवाईत घेतला यांनी सहभाग
पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागामार्फत ही कारवाई सुरूच ठेवण्यात येणार असल्याची आहे. या मोहिमेत मुख्याधिकारी संजीवनी दळवी यांच्यासह स्थापत्य अभियंता कोमल साबळे, नवीन कांबळे, कुंडलिक लाखे, उमेश कांबळे, वीरेंद्र कांबळे, रोहित गाढवे, योगेश गाडे, राहुल गाडे, चंद्रकांत अडसूळ, अनिल कांबळे, सागर लाड, परेश लाड, महेश लाड, भूषण चव्हाण या पालिका कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.