सातारा नगरपालिकेच्या 60 फ्लेक्सवाल्यांना नोटिसा; 2 लाख 10 हजार रुपयांचा दंड भरण्याच्या सूचना

0
2
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा पालिका प्रशासनाच्या वतीने तब्बल ६० फ्लेक्सधारकांना नोटीस पाठवली असून २ लाख १० हजार रुपये दंड भरण्याच्या सूचना पालिकेकडून करण्यात आलेल्या आहेत. विधानसभा निवडणूक काळात निवडणुकीच्या निकालाच्या काळात शहरात चौकाचौकात फ्लेक्स लावण्यात आले होते. त्यातील काही फ्लेक्स हे विनापरवाना लागल्याची बाब पालिकेच्या अतिक्रमण हटावच्या निदर्शनास आली. त्यांनंतर पथकाने सर्व्हे केला असता ६० जणांनी विनापरवाना कोणतीही परवानगी वा पालिकेचा कर न भरता फ्लेक्स लावल्याचे आढळून आले. त्यांना प्रत्येकी ६० हजार असा दंड एकूण २ लाख १० हजार रुपयांचा दंड भरण्याची नोटीस पालिकेने बजावली आहे.

शहरी भागात शुभेच्छा अथवा जाहिरातीचे बॅनर, फ्लेक्स लावण्यासाठी सातारा पालिकेकडे परवानगी घ्यावी लागते. तसेच शहरात काही ठिकाणे ही बॅनर लावण्यास मनाई आहे. तरीही काही उत्साही कार्यकर्ते हे आर्वजून नेत्यांच्या नावाचे बॅनर, फ्लेक्स हे विनापरवाना लावतात. जर पालिकेची परवानगी घेतली तर त्या परवानगीची पावती त्या बॅनरवर न लावता तसेच बॅनर लावले जातात.

अशाच काही कार्यकर्त्यांनी विधानसभा निकालानंतर सातारा शहरात बॅनर लावले होते. त्या सर्व बॅनरबाबतचा सर्व्हे पालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाच्या पथकाने केला. त्यामध्ये सुमारे ६० जणांचे बॅनर हे विनापरवाना आढळून आले. त्यांना रितसर दंडाची नोटीस पालिकेच्या वतीने बजावली आहे.