कराड दक्षिण विधानसभेसाठी आज पृथ्वीराज चव्हाणांसह चौघांनी भरले अर्ज; 8 उमेदवारी अर्जांची विक्री

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ निवडणूक प्रक्रियेत नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास दि. २२ ऑक्टोबर रोजीपासून सुरुवात झाली आहे. दरम्यान, आज २६० कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे नेते तथा महा विकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह चार उमेदवारांनी ६ नामनिर्देशन पत्र दाखल केली आहेत. आज अखेर १३ उमेदवारांनी १६ नामनिर्देशन पत्र दाखल केलेली असल्याची माहिती २६० कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी स्मिता पवार, नायब तहसीलदार हेमंत बेसके यांनी दिली.

अधिक माहिती देताना निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी सांगितले की, आज दि. २८ ऑक्टोबर अखेर खुल्या प्रवर्गातील ३६, अनुसूचित जातीतील १८, अनुसूचित जमाती ०, यामध्ये अपक्ष उमेदवार ३३, पक्षीय उमेदवार २२ इ. जणांनी अर्ज खरेदी केले आहेत. यामध्ये नॅशनॅलिस्ट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून १ अर्ज, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पार्टीकडून ४ अर्ज, बहुजन समाज पार्टीकडून ४ अर्ज, बहुजन समाज पार्टी (मायावती) कडून १ अर्ज, शिवराज युवक संघटना (महाराष्ट्र) कडून १ अर्ज,, महाराष्ट्र नवनिर्माण सेने कडून १ अर्ज,

वंचित बहुजन आघाडी पार्टीकडून १ अर्ज, राष्ट्रीय समाज पक्षा कडून १, भारतीय जनता पार्टी कडून ४ अर्ज, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून १ अर्ज, स्वाभिमानी पक्ष शेतकरी संघटना यांचेकडून १, शेतकरी संघटनेकडून १ अर्ज, राष्ट्रीय मराठा पार्टीकडून १ अर्ज,  अपक्ष -३३  असे अर्ज  खरेदी केले आहेत. तसेच आज एकूण ५ उमेदवार यांनी ६ नामनिर्देशन पत्र दाखल केलेले आहेत.  आज अखेर १३ उमेदवारांनी १६ नामनिर्देशन पत्र दाखल केलेली आहेत. त्यामध्ये भारतीय जनता पार्टीकडून २ उमेदवार यांनी ४ अर्ज, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस च्या १ उमेदवार यांनी २ अर्ज, रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (A) १ अर्ज, वंचित बहुजन आघाडी कडून १ अर्ज व अपक्ष उमेदवार यांनी ८ अर्ज दाखल केले आहेत.