सातारा प्रतिनिधी । भाजप खासदार उदयनराजे भोसले यांची काल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली. तसेच त्यांच्याशी महत्वाच्या विद्यांवर देखील चर्चा केली. दरम्यान, खा. उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्या ठिकाणी मुख्यमंत्री गेले असता एका पोलिस अधिकाऱ्यांनी चक्क मुख्यमंत्री यांच्यात बॉडीगार्डला नो एन्ट्री केली. त्यामुळे साताऱ्यात प्रोटोकॉलचा अतिरेक होत असल्याची चर्चा दिवसभर सुरु होती.
सातारा शहर व जिल्ह्यातील सर्वसामान्य व्यक्तींना अडीअडचणी सोडवण्यासाठी व न्याय मागणीसाठी सातारा शहरातील एक तर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सुरुची बंगल्यावर व खासदार उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर या निवासस्थानी भेट द्यावी लागते. या ठिकाणी सामान्य माणसाला सुद्धा भेट घडवून आणली जाते. त्यांचे प्रश्न मार्गी लागतात. मात्र, काल खा. उदयनराजे यांच्या जलमंदिर येथे प्रोटोकॉलचा अतिरेक झाल्याचे पाहण्यास मिळाले.
एका पोलीस अधिकाऱ्यांनी चक्क बॉडीगार्ड यांनाच मुख्यमंत्री शिंदे यांच्या पाठीमागे जलमंदिर परिसरात जाण्यास मज्जाव केला. त्यांना रोखून धरले. खरं म्हणजे मुख्यमंत्री शिंदे यांच्या प्रोटोकॉल च्या नियमाप्रमाणे त्यांना कोणती इजा होऊ नये. याची संपूर्ण जबाबदारी ही बॉडीगार्ड वर असते. एका कार्यक्रमांमध्ये एक शासकीय अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या जवळ जात असताना बॉडीगार्डने त्याला समजून सांगून पाठीमागे उभे रहा असा सल्ला दिला पण त्याने तो ऐकला नाही. त्यानंतर चक्क त्याला उचलून बाजूला केले.