कराड प्रतिनिधी | सह्याद्री सहकारी साखर कारखाना हा सभासदांचा आहे. या कारखान्याच्या उभारणीसाठी सभासदांचा मोलाचा वाटा आहे. पश्चिम महाराष्ट्रात नावारूपास आलेल्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्यात यंदा पंचवार्षिक निवडणूक सुरू असून या निवडणुकीत स्व. यशवंतराव चव्हाण सह्याद्री स्वाभिमानी सभासद परिवर्तन पॅनेलच विजय होणार हे नक्की आहे. स्वाभिमान जपण्यासाठी सह्याद्रीत परिवर्तनाची लाट यंदा अटळ आहे. सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीचे वातावरण फिरलय बाळासाहेबांचा पराभव निश्चित असल्याचे स्व. यशवंतराव चव्हाण सह्याद्री स्वाभिमानी सभासद परिवर्तन पॅनेलचे प्रमुख उमेदवार निवास थोरात यांनी म्हंटले.
स्व. यशवंतराव चव्हाण सह्याद्री स्वाभिमानी सभासद परिवर्तन पॅनेलचे प्रमुख उमेदवार निवास थोरात यांच्याकडून कराडसह इतर तालुक्यात प्रचाराचा धडाका लावला जात आहे. दरम्यान, कराड तालुक्यात त्यांच्याकडून गावोगावी प्रचार केला जात आहे. गाव भेटीदरम्यान, त्यांनी मतदार बांधवांशी संवाद साधला. यावेळी सभासदांनी सांगितलं कि निवडणूक लढायाच आहे. आमची प्रमुख लढत विद्यमान चेअरमन आणि माजी आमदार बाळासाहेब पाटील यांच्याशीच आहे. आमची निवडणूक तिसऱ्या पॅनलशी मुळातच नाही. आम्ही प्रामाणिकपणे सभासदांचे प्रश्न मांडत आलो आहोत.
आज विद्यमान चेअरमन यांनी सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांना योग्य न्याय दिला आहे का? त्यांच्या हिताच्या दृष्टीने किती निर्णय घेतले? असे अनेक प्रश्न सभासद शेतकरी विचारत आहेत. ही निवडणूक अटीतटीची असून यात आपलाच विजय आहे.
दरम्यान, गेल्या चार दिवसांपासून स्व. यशवंतराव चव्हाण सह्याद्री स्वाभिमानी सभासद परिवर्तन पॅनेलचे माध्यमातून प्रचार केला जात असून आमच्या पॅनलला सभासद शेतकरी बांधवांचा मोठ्या प्रमाणात पाठींबा मिळत आहे. विद्यमान चेअरमन आणि माजी आमदार बाळासाहेब पाटील यांच्याशीच आहे. आम्ही प्रामाणिकपणे सभासदांचे प्रश्न मांडत आलोय. सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांना न्याय देण्यासाठी आम्ही हि निवडणूक लढण्याची भूमिका घेतलेली आहे, असे निवास थोरात यांनी प्रचार भेटीवेळी म्हंटले.