सरावासाठी अद्ययावत सुविधा व साहित्य पाहिजे? ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज सादर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत खेळाडू विकास आराखडा तयार करण्यात येत आहे. या आराखड्यामधून सातारा जिल्ह्यातील खेळाडूंना अद्ययावत सुविधा व साहित्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
त्यामुळे सातारा जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर उच्चत्तम कामगिरी केलेल्या खेळाडूंनी दि. 15 जुलै रोजीपर्यत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडे अर्ज सादर करून मागणी करावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांनी केले आहे.

जिल्हा क्रीडा अधिकारी तारळकर यांनी म्हंटले आहे की, सातारा जिल्ह्यात अनेक खेळाडू आहेत. त्या खेळाडूंना सरावासाठी अद्यायावत सुविधा व साहित्य हवे असते. ते साहित्य त्यांना जिल्हा क्रीडा विभागामार्फत दिले जाते. सध्या जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत खेळाडू विकास आराखडा तयार केला जात आहे.

तसेच क्रीडांगण विकास अनुदान योजनेंतर्गत क्रीडांगणावर विविध सुविधा, विकसित व्यायामशाळा विकास अनुदान योजनेंतर्गत व्यायामशाळा इमारत बांधकाम व व्यायामशाळा साहित्य पुरवठा करण्याकरिता 7 लाख रुपयांचे अनुदान जिल्हा वार्षीक योजना व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभागमधून मंजूर करण्यात येते. त्यानुसार विविध शाळा/महाविद्यालय, स्थानिक स्वराज्य संस्थांनी मंजुरीकरिता दोन प्रस्ताव तयार करावेत. आणि दि 21 जुलै पर्यंत क्रीडा अधिकारी कार्यालय, श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा येथे सादर करावे, असे जिल्हा क्रीडा अधिकारी तारळकर यांनी म्हंटले आहे.