सातारा जिल्हयाला मिळणार आणखी एक खासदार; नितीनकाका पाटील राज्यसभेसाठी आज अर्ज भरणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | लोकसभेच्या निवडणुकी दरम्यान सातारा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उमेदवार उभा राहील आणि राज्यसभेची उमेदवारी नितीन पाटील यांना दिली जाईल, असा शब्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला होता. त्यानुसार त्यांनी केलेल्या माहितीनुसार सातारची राज्यसभेची जागा भाजपने त्यानं दिली असून या जागेवर आता नितीन काका पाटील यांची वर्णी लागली आहे. दरम्यान, नितीन पाटील मुंबईला दाखल झाले असून महायुतीच्या सर्व नेत्यांच्या उपस्थितीत ते आज बुधवारी मुंबई विधान भवनात अर्ज भरणार आहेत.

नितीन काका पाटील यांची खासदारकीसाठी वर्णी लागली असल्यामुळे वाईसह राष्ट्रवादीच्या गोटात आनंद द्विगणितई झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची सोमवारी बैठक पार पडली. या बैठकीत नितीन पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.

या बैठकीला अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित होते . बुधवारी दुपारी १२ वाजता नितीन पाटील राज्यसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. राज्यसभेच्या निमित्ताने नितीन काका यांची नवी राजकीय इनिंग सुरू होत असून सातारा जिल्ह्याला पाटील यांच्या रूपाने दुसरा खासदार मिळाला आहे .