कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील आगाशिवनगरात दोन समाजाच्या व्यावसायिकांमध्ये मारहाण झाल्याची घटना सोमवार, दि.१२ रोजी रात्री घडली होती. या घटनेनंतर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मारहाण झालेल्या संबंधित पवार कुटुंबांची भेट घेतली. गुन्हा नोंद करायला गेलेल्या पवार कुटुंबांला पोलिसांकडून अपशब्द वापरल्याचे समजताच राणेंनी आक्रमक पावित्रा घेत पोलिसांना धारेवर धरले. “एखाद्या अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे संपूर्ण पोलिस खात्याची बदनाम होत असेल तर ते सहन केले जाणार नाही. यापुढे आम्ही निवेदन मागण्या करत बसणार नाही, थेट घुसण्याची तयारी ठेवली आहे,” असा राणे यांनी इशारा दिला.
कराड तालुक्यातील आगाशिवनगर मलकापूर येथे सोमवारी दोन समाजातील व्यावसायिकांच्यात वाद झाला. त्या वादाचे रूपांतर पुढे मारामारीत झाले. या प्रकारानंतर पोलिसांनी मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले. मारहाण झालेल्या पवार कुटुंबियांची राणे यांनी भेट घेऊन त्यांच्यासोबत चरचा केली. कुटुंबियांशी चर्चा करत असताना पवार कुटुंबासह जमलेल्या नागरिकांनी संबंधित व्यावसायिकाकडून देण्यात आलेल्या त्रासाबाबतची माहिती नितेश राणे यांना दिली.
तसेच मारहाण झाल्यानंतर याबाबतचा गुन्हा नोंद करायला गेले असता पोलिसांकडून अपशब्द वापरल्याचे सांगितले. यावेळी राणे यांनी पोलीसांशी फोनद्वारे संपर्क करून चर्चा केली. तसेच याप्रकरणी सर्व घडामोडीची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देणार असल्याचे सांगितले. एखाद्या अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे संपूर्ण पोलिस खात्याची बदनाम होत असेल तर ते सहन केले जाणार नाही. यापुढे आम्ही निवेदन मागण्या करत बसणार नाही, थेट घुसण्याची तयारी ठेवली आहे, असा राणे यांनी इशारा दिला. दरम्यान, मारहाणीच्या घटनेनंतर सकल समाजाने दिलेली आज, बुधवारी कराड बंदची हाक दिली होती. ती मागे घेत प्रशासनाला याबाबत निवेदन देण्याचा निर्णय घेतला. तरीही अनेक व्यावसायिकांनी बुधवारी दुकाने बंदच ठेवली होती.