कराड प्रतिनिदि । कराड तालुक्यातील हजारमाची ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी निर्मला जिरगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर सत्ताधारी सदस्य, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष साजरा केला.
विद्या घबाडे यांनी राजीनामा दिल्याने हजारमाचीचे सरपंच पद रिक्त झाले होते. मंगळवारी निवडणूक निर्णय अधिकारी तथा सैदापूरचे मंडल अधिकारी चंद्रकांत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सदस्यांची बैठक झाली. या बैठकीत निर्मला जिरगे यांची सरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी उपसरपंच शरद कदम, सदस्य कल्याणराव डुबल, अवधूत डुबल, विनोद डुबल, पितांबर गुरव, विद्या घबाडे, संगीता डुबल, सारीका लिमकर, जयश्री पवार, सिता माने, पुनम रामुगडे, ऐश्वर्या वाघमारे, तलाठी शेखर भोसले व ग्रामसेवक एन. व्ही.चिंचकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
सरपंच पदाच्या निवडीसाठी अर्ज दाखल करण्याच्या वेळेत निर्मला जिरगे यांचा एकच अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी चंद्रकांत जाधव यांनी निर्मला जिरगे यांची सरपंच पदी बिनविरोध निवड जाहीर केली. निवडीनंतर सत्ताधारी गटाचे सदस्य, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष साजरा करण्यात आला.
निवडीनंतर सरपंच निर्मला जिरगे म्हणाल्या की, आमदार बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सहकारी सदस्यांना विश्वासात घेऊन गावाच्या विकासासाठी प्रयत्न करणार आहे. यावेळी प्रल्हादराव डुबल, नंदकुमार डुबल, शिवाजीराव डुबल, उदयसिंह पाटील, प्रकाश पवार, धनाजी माने, पराग रामुगडे, मुरारजी माने, मिलींद सुर्वे, राजू जिरगे, रविंद्र डुबल, मुरारजी माने, सर्जेराव पानवळ, मिलींद तोडकर, संजय लिमकर, गणेश घबाडे, निलेश डुबल ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते.