कराड प्रतिनिधी | कराड येथील विमानतळावर अनेक सुविधा उभारणीसाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. नुकताच विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी राज्य सरकारकडून 221.51 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. चार महिन्यांच्या दिवसाच्या प्रशिक्षणानंतर आता नुकतेच प्रशिक्षणार्थींना नाईट लँडिंग, टेक ऑफचे प्रशिक्षण देण्याच्या दुसऱ्या टप्प्यास सुरुवात करण्यात आली आहे. कराड विमानतळावर आंबिशन्स फ्लाइंग क्लबने नाइट फ्लाइंग सुरू केली असून त्यासाठी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने रीतसर परवानगी दिली आहे.
तब्बल 4 महिन्यांपासून अँबिशिएन्स फ्लाईंग क्लबच्यावतीने कराड येथील विमानतळावर वैमानिक प्रशिक्षण देण्यासाठी फ्लाईंग अकॅडमी उभारण्यात आली. 11 महिन्यापूर्वी प्रशिक्षणासाठीची 3 विमाने या ठिकाणी आणण्यात आली होती. त्यांच्याकडून 11 महिन्यात अनेक प्रकारच्या चाचण्या देखील घेण्यात आल्या. कालांतराने 4 महिन्यापूर्वी या ठिकाणी वैमानिक प्रशिक्षण देण्यास सुरुवात करण्यात आली.
सध्या कराड येथील विमानतळावर प्रशिक्षणासाठी एकूण पाच विमाने या अकॅडमीत असून यातील सेन्सा 172 ही दोन विमाने तर सेन्सा 152 हे एक विमान येथील विमानतळावर आहेत. यातील दोन विमाने दोन सीटची तर एक विमान चार सीटचे आहे. ही विमाने ठेवण्यासाठी व मेन्टेनन्ससाठी विमानतळावर बाजूला एअरक्राफ्ट हँगरची निर्मिती करण्यात आली आहे. या ठिकाणी टेक्निकल स्टाफ काम पाहत आहे.
विशेष म्हणजे एका वर्षात स्थानिकांसह देशभरातील सुमारे 50 विद्यार्थी येथे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यांचा कालावधी 2 वर्षे इतका आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर खासगी विमान कंपन्यांमध्ये या विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. आता प्रत्यक्षपणे प्रशिक्षणास आजपासून सुरुवात करण्यात आली असल्यामुळे याचा नक्कीच फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे.
200 तासांचे दिले जातेय प्रशिक्षण…
सध्या कराडच्या विमानतळावर 4 सीटरची 2 विमाने आणि 2 सिटरची 2 विमाने प्रशिक्षणासाठी उपलब्ध आहेत. 6 सीटरचे विमान दाखल झाले असून या ठिकानी सध्या 40 विद्यार्थ्यांच्या बॅचचे प्रशिक्षण सुरू आहे. प्रशिक्षित व्यावसायिक पायलट बनण्यासाठी 200 तासांचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना घ्यावे लागणार आहे. हा फ्लाईंग क्लब पश्चिम महाराष्ट्रातील दुसरा क्लब आहे.
फेब्रुवारी 2019 मध्ये केली होती घोषणा
पुणे, जळगाव, लातूर, नागपूर बारामती, धुळेनंतर आता कराड सारख्या ठिकाणी विमान चालविण्याचे प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे याचा वैमानिक होण्यासाठी कराड भागातील युवक-युवतींना देखील लाभ होणार आहे. दमानिया एअरवेजने महाराष्ट्र शासनाशी करार करून फ्लाईंग अकॅडमी सुरू करण्याच्या दिशेने पावले टाकली. फेब्रुवारी 2019 मध्ये परवेज दमानिया यांनी कराड विमानतळाची पाहणी करून फ्लाईंग अकॅडमीची घोषणा केली होती. त्यानंतर सुविधा उपलब्ध केल्या. या माध्यमातून रोजगार निर्मितीसह स्थानिक पातळीवर आर्थिक विकासाला देखील मोठी चालना मिळण्यास मदत होणार हे नक्की.
कराडच्या विमानतळ विस्तारीकरणास 221.51 कोटींचा निधी मंजूर
पर्यटन वाढीसाठी कराड विमानतळाचे विस्तारीकरण आणि विकास करणे आवश्यक आहे. त्या कामांसाठी एमएडीसी अंतर्गत असणाऱ्या विमानतळाच्या विस्तारी करणासाठी राज्य सरकारकडून 221.51 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. दरम्यान, कराड विमानतळाच्या विस्तार / विकास कामासाठी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना 28 ऑगस्ट 2012 रोजीच्या शासन निर्णयान्वये 95.60 कोटी रु. च्या खर्चास वित्तीय मान्यता देण्यात आली होती. पावसाळी अधिवेशनात माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी निधीची मागणी केल्यानंतर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी तीन महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्च स्तरीय मिटिंग घेण्याचे आश्वासन दिले होते. तसेच आपण विस्तारीकरणाचे काम लवकरच पूर्ण करू, असा शब्द उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला होता. त्यानुसार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांनी दिलेला शब्द पाळला. आणि कराडच्या विमानतळ विस्तारीकरणास 221.51 कोटींचा निधी मंजूर झाला
अशी आहे विस्तारीकरणाच्या कामाच्या खर्चाची तरतूद…
१) सुमारे 45.82 हेक्टर अतिरीक्त जमिन संपादन,
२) प्रांत कार्यालय अस्थापना खर्च, प्रकल्पबाधीत घरांची किंमत – 89 कोटी 71 लाख
३) प्रकल्पबाधित घरांचे पुनर्वसन जागी सुविधांसाठी खर्च – सात कोटी १२ लाख
४) प्रकल्प बाधितांच्या कॉलनीसाठी खर्च – 20 कोटी
५) बाधित शेतक-याच्या पुनर्वसन पॅकेजसाठी – 11 कोटी 53 लाख
६) टर्मिनस बिल्डींग, एटीसीटॉवर, फायर यंत्रणा खर्च – 10 कोटी 91 लाख
७) धावपट्टीचे काम, ॲप्रन, नेव्हीगेशन, कम्युनिकेशन सिस्टीम – 29 कोटी 73 लाख
८) जमिनीचे सपाटीकरण, संरक्षक भिंत, पावसाळी नाल्याची निर्मीती ः 14 कोटी 59 लाख
९) भैरवनाथ पाणी योजनेच्या पाईपलाइनचे स्थलांतर खर्च – आठ कोटी 50 लाख
१०) प्रकल्प सल्लागार शुल्क, इतर नियामक मंडळांची मंजूरी खर्च – एक कोटी 26 लाख
११) महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचा प्रशासकीय, आस्थापना खर्च – आठ कोटी चार लाख
१२) प्रकल्प खचात 10 टक्के वाढ धरुन होमारी रक्कम ः 20 कोटी 12 लाख